Corona : कोरोनाचा विळखा वाढताच, नागपुरात जनजागृतीसाठी ‘कोरोना पुतळा’

नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. त्याच भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे.

Corona : कोरोनाचा विळखा वाढताच, नागपुरात जनजागृतीसाठी 'कोरोना पुतळा'
Follow us
| Updated on: Apr 18, 2020 | 8:40 AM

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस (Nagpur Corona Statue) कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 59 वर गेली आहे. त्यामुळे कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी नागपुरात कोरोनाचा पुतळा (Nagpur Corona Statue) उभारण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस आणि प्रशासनच्या वतीने दररोज नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोरोनाचा पुतळा शहरात उभारण्यात आला आहे. नागपुरातील टेलिफोन एक्सचेन्ज चौकात हा पुतळा लावला आहे. जे लॉकडाऊन असतानाही विनाकारण बाहेर फिरतात त्यांना कोरोनाची दहशत कळावी, लॉकडाऊन किती महत्त्वाचं आहे आणि याबाबतची जनजागृती व्हावी, म्हणून हा पुतळा उभारण्यात आला आहे.

नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. त्याच भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे. या निमित्ताने लोकांनी घरी राहावं, लॉकडाऊनचं पालन करावं, असं आवाहन लकडगंज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र हिवरे यांनी केलं आहे (Nagpur Corona Statue).

राज्यात 3320 कोरोनाग्रस्त

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). राज्यात आज दिवसभरात 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 331 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली (Total Corona Patient in Maharashtra).

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 3320 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Nagpur Corona Statue

संबंधित बातम्या :

Lockdown : एपीएमसीतील फळ मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरु

राज्यात प्रॉपर्टी व्यवहारांच्या नोंदणीस परवानगी, अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती

Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर

लॉकडाऊन काळात 50 हजार गुन्हे दाखल, 1 कोटींचा दंड वसूल, 10 हजार जणांना अटक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.