नागपूरसाठी दिलासादायक बातमी, मेयो-मेडिकलमध्ये 339 पैकी 309 कोरोना रुग्णांना एकही लक्षण नाही
नागपूरमध्ये बहुसंख्य कोरोना रुग्णांना कुठलीही लक्षणं नसल्याने कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाणंही मोठं आहे (Nagpur Corona Updates Recovery rate).
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, यातील बहुसंख्य कोरोना रुग्णांना कुठलीही लक्षणं नसल्याने कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाणंही मोठं आहे (Nagpur Corona Updates Recovery rate). नागपूरमधील मेयो आणि मेडिकल कोविड रुग्णालयात सध्या 339 कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. यात सर्वात दिलासादायक बातमी म्हणजे 339 पैकी तब्बल 309 रुग्णांना कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत.
कोरोना रुग्णांना लक्षणं नसल्यानं कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण मोठं आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांना नव्या नियमानुसार आता 10-12 दिवसांनंतर घरी सोडून देण्यात येते. या काळात असे रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागपूरात आतापर्यंत 68 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुक्तांचं प्रमाणही अधिक असल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत तब्बल 905 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
नागपूरच्या मेयो रुग्णालयात सध्या 146 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 140 रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. नागपूरमधीलच मेडिकल रुग्णालयात एकूण 193 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 169 रुग्ण लक्षणं नसलेली आहेत.
दरम्यान, राज्यात सोमवारी (22 जून) दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 721 नवे रुग्ण आढळले (Maharashtra Corona Cases Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 796 वर पोहोचली आहे. राज्यात दिवसभरात 1 हजार 962 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Corona Cases Update) यांनी दिली.
राज्यात आतापर्यंत 6 हजार 283 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत एकूण 67 हजार 706 रुग्ण बरे झाले आहेत. तर 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 6 हजार 283 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
6 लाख 01 हजार 182 लोक होम क्वारंटाईन
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 87 हजार 419 नमुन्यांपैकी 1 लाख 35 हजार 796 नमुने पॉझिटिव्ह (17.6 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 01 हजार 182 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 26 हजार 910 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत (Maharashtra Corona Cases Update).
राज्यात कोरोनाग्रस्त दुप्पट होण्याचा कालावधी 26 दिवसांवर
“राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा (डबलिंग रेट) कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे 26 दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 49.86 टक्के एवढा आहे”, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 4.63 टक्के आहे.
कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
Shivsena Bhavan : ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण, शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवस बंद
Raj Thackeray Drivers COVID | राज ठाकरे यांच्या वाहनचालकांना कोरोनाची लागण
झोपडपट्टया नाही, मुंबईत आता इमारतींमध्ये ‘कोरोना’चे हॉटस्पॉट
Nagpur Corona Updates Recovery rate