नागपूर : नागपुरात कोरोनाचा तांडव सुरु आहे (Nagpur COVID-19 Death Analysis). कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या दररोज 40 ते 50 जणांचे मृत्यू होतच असल्याने प्रशासन सुद्धा चिंतीत आहे. त्यामुळे आता त्याची कारणे शोधायला सुरवात झाली आहे. कोरोनामुळे होणारे 80 टक्के मृत्यू हे वेळेवर उपचारासाठी न आल्याने होत असल्याचं नागपूर प्रशासनाचं म्हणणं आहे (Nagpur COVID-19 Death Analysis).
नागपूर शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. मृत्यूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत मृत्यूचं तांडव नागपुरात सुरुच आहे. दर दिवसाला 40 ते 50 जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत सुद्धा वेटिंग लिस्ट वाढल्याचं चित्र आहे.
यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. महापालिकेने आता डेली डेथ अॅनलिलीस करायला सुरुवात केली. त्यातून पुढे असं आलं की, नागरिक आपली लक्षणं लपवितात. आधी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. मात्र, कोरोनाची चाचणी करत नाही आणि जेव्हा अतिप्रमाणात कोरोनाचा प्रभाव वाढतो तेव्हा ते कोव्हिड रुग्णालयात येतात. मात्र, तोपर्यंत उशिर झालेला असतो आणि रुग्णाचा मृत्यू होतो. आतापर्यंत 80 टक्के रुग्णांचा मृत्यू या कारणामुळे झाल्याचं समोर आलं आहे.
नागपूर महापालिका क्षेत्रात मेयो, मेडिकल, एम्स हे सरकारी रुग्णालयं आहेत. तर काही खाजगी आणि महापालिकेच्या रुग्णालयात सुद्धा उपचार होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. टेस्ट केली, तर आपली टेस्ट पॉझिटिव्ह येईल, मग रुग्णालयात बेड मिळेल की नाही. उपचार घ्यायचा म्हटलं, तर डॉक्टर मिळेल का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येतात. त्यामुळे अनेक जण टेस्ट करायचं टाळत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे.
महापालिका नागरिकांना वारंवार आवाहन करत आहे की कोरोनाची भीती बाळगू नका. मात्र, काळजी घ्या आणि लक्षणं दिसत असल्यास तात्काळ उपचार घ्या.
नागपुरात लॉकडाऊन लावा, वडेट्टीवारांची मागणी, पालकमंत्र्यांचा विरोधhttps://t.co/rkbqVwco4s@VijayWadettiwar @NitinRaut_INC #NagpurCorona
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 14, 2020
Nagpur COVID-19 Death Analysis
संबंधित बातम्या :
नागपूरकरांनो सावधान! मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचे गृहमंत्र्यांचे आदेश
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागपूरमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत