Nagpur Crime | नागपुरात गुन्हेगारी थांबेना, गुंडांकडून गुंडाचं अपहरण, दगडाने ठेचून हत्या

नागपुरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नागपुरात गुंडानेच गुंडाचं अपहरण करुन हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

Nagpur Crime | नागपुरात गुन्हेगारी थांबेना, गुंडांकडून गुंडाचं अपहरण, दगडाने ठेचून हत्या
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 7:44 PM

नागपूर : नागपुरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत (Nagpur Crime News) चालली आहे. नागपुरात गुंडानेच गुंडाचं अपहरण करुन हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाली असून आरोपी आणि मृतक सोबतच चोरीच्या धंद्यात (Nagpur Crime News) होते.

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा थरारक प्रकार घडला. मोटर सायकल वरुन आलेल्या तीन आरोपींनी एकाच मोटर सायकल वरुनच अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

सनी जंगीड हा अंत्यसंस्कारासाठी गेला होता. घाटावरुन परतत असताना त्याला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने त्याला एका ठिकाणी बोलावलं. संनी जंगीड त्या ठिकाणी पोहोचला. तिथे मोटर सायकल वरिन आलेल्या तीन युवकांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर त्या तिघांनी त्याला मोटार सायकलवर बसवून थुंडा मारोती भागातील जंगलात निर्जन ठिकाणी नेलं. तिथे दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर सनीचा मृतदेह जंगलात फेकून दिला (Nagpur Crime News).

अपहरणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शोध सुरु केला. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असता त्याने या हत्येची माहिती दिली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतक सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ते बाईक चोरी करायचे. चोरीच्या पैशांवरुन त्यांच्यात वाद होता. त्याशिवाय, वर्चस्वाची लढाईसुद्धा, त्यामुळे ही हत्या झाली असून पोलिसांनी इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे. मात्र, या हत्येनंतर परिसरात गॅंगवॉर तर पसरणार नाही ना, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

Nagpur Crime News

संबंधित बातम्या :

इचलकरंजीत 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमांनी चिमुकलीला विहिरीत फेकलं

मुलीच्या लग्नात अडथळा, आईकडून मुलीच्या प्रियकराचा खून

‘वारणा कामगार सोसायटी’च्या संचालकाची हत्या, देवपूजा करताना पत्नीकडून डोक्यात हातोडा

इचलकरंजीत 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमांनी चिमुकलीला विहिरीत फेकलं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.