पती आणि दोन मुलांची इंजेक्शन देऊन हत्या, महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपुरात खळबळ

डॉ. सुषमा राणे यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं, तर पती आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर सापडले

पती आणि दोन मुलांची इंजेक्शन देऊन हत्या, महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपुरात खळबळ
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 10:51 AM

नागपूर : प्राध्यापक पती, मुलगा आणि मुलीची इंजेक्शन देऊन हत्या केल्यानंतर डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. राणे कुटुंबात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur Doctor allegedly kills husband children commits Suicide)

नागपूरमधील कोराडी भागात असलेल्या ओमनगर जगनाडे लेआऊटमध्ये काल दुपारी ही घटना उघडकीस आली. 42 वर्षीय धीरज दिगंबर राणे, 39 वर्षीय पत्नी डॉ. सुषमा धीरज राणे, 11 वर्षीय मुलगा ध्रुव धीरज राणे आणि पाच वर्षांची मुलगी लावण्या धीरज राणे यांचे मृतदेह आढळले होते.

डॉ. सुषमा राणे यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं, तर पती आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर होते. सुरुवातीला दाम्पत्याने मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु डॉक्टर पत्नीने पती आणि मुलांची इंजेक्शन देऊन हत्या केल्यानंतर गळफास घेतल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

धीरज राणे हे वानाडोंगरीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाचे विभाग प्रमुख होते, तर डॉ. सुषमा या धंतोलीतील अवंती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. त्यामुळे डॉ. सुषमा राणे यांनी पती व मुलांची हत्या करुन आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राणे दाम्पत्यासोबत धीरज यांची 65 वर्षीय आत्या राहते. दुपार झाल्यानंतरही चौघे खोलीतून बाहेर न आल्याने प्रमिला यांनी आवाज दिला. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने प्रमिला यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवून खोलीचा दरवाजा उघडला असता धीरज, ध्रुव व लावण्या या तिघांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळले तर पंख्याला डॉ. सुषमा गळफास लावलेल्या स्थितीत दिसल्या.

(Nagpur Doctor allegedly kills husband children commits Suicide)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.