Balya Binekar | नागपुरात गँगस्टर बाल्या बिनेकरच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी, छतांवरही बघे, दोन हजार जण जमल्याची चर्चा

बाल्या बिनेकर राहत असलेल्या लालगंज खैरीपुरा भागातून निघालेल्या अंत्ययात्रेत दोन हजाराहून जास्त नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे.

Balya Binekar | नागपुरात गँगस्टर बाल्या बिनेकरच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी, छतांवरही बघे, दोन हजार जण जमल्याची चर्चा
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 12:28 PM

नागपूर : नागपुरात भरदिवसा हत्या करण्यात आलेल्या गँगस्टर बाल्या बिनेकरच्या (Balya Binekar) अंत्ययात्रेला मोठी गर्दी उसळली होती. लालगंज खैरीपुरा भागातून निघालेल्या अंत्ययात्रेत दोन हजार जण सहभागी झाल्याचे बोलले जाते. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागपूरमधील गजबजलेल्या भोले पेट्रोल पंप चौकात शनिवारी पाच आरोपींनी गँगस्टर बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या केली होती. (Nagpur Gangster Balya Binekar Funeral Crowd)

बाल्या राहत असलेल्या लालगंज खैरीपुरा भागातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत दोन हजाराहून जास्त नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे. परिसरातील घरांच्या छतावर बघ्यांची संख्या मोठी होती. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोण होता बाल्या बिनेकर?

बाल्या उर्फ किशोर बिनेकर याचं नागपुरात सावजी भोजनालय आहे. त्याचबरोबर तो जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर काही हल्लेखोर पाळत ठेवून होते. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल होते. मात्र तो राहत असलेल्या भागातील लोकांना तो त्रास देत नसल्याचे बोलले जाते.

बाल्या बिनेकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा उलगडा केला आणि चेतन हजारे, रजत तांबे, भरत पंडित या तीन आरोपींना रामटेकमधून अटक केली. त्यानंतर आणखी दोघा साथीदारांना बेड्या ठोकल्या.

अशी झाली हत्या…

बाल्या बिनेकरची कार शनिवार 26 सप्टेंबरला नागपुरातील भोले पेट्रोल पंप चौकात थांबली. त्याच वेळी पाच आरोपींनी कारची काच फोडून धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. यामध्ये बाल्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांतील नागपुरातील हे सर्वात थरारक हत्याकांड असल्याचं पोलीस सूत्र सांगतात. (Nagpur Gangster Balya Binekar Funeral Crowd)

हत्येचं कारण काय?

पाच आरोपींपैकी चेतन हजारे याच्या वडिलांची बाल्या बिनेकरने 2001 मध्ये हत्या केली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. बाल्या बिनेकरचे साथीदार आरोपी चेतनला ‘तुझ्या वडिलांची हत्या केल्यावरही तू काहीच करु शकत नाहीस’ असं म्हणून डिचवायचे. त्यामुळे आरोपी चेतन हजारेने बाल्या बिनेकरची हत्या करण्याची योजना आखली होती. त्यानुसार चेतन हजारे आणि त्याच्या चार साथीदारांनी हत्या केली.

संबंधित बातम्या

आधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या

कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24 तासात सापडले, हत्येचं कारणही उघड

(Nagpur Gangster Balya Binekar Funeral Crowd)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.