धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साजरा करा, नागपूर पालकमंत्री नितीन राऊतांचं आवाहन
धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा, असं आवाहन नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्व बौद्ध अनुयायांना केलं आहे.
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा (Dhammachakra Pravartan Din), असं आवाहन नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सर्व बौद्ध अनुयायांना केलं आहे. कोरोनाच्या नियमांमुळे यंदा पहिल्यांदाच दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर टाळं लागलं आहे (Dhammachakra Pravartan Din).
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे यंदा दसरा सणही साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे राज्यभरात दसरा राज्य सरकारच्या नियमांचे पालन करुन आणि सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत साजरा केला जाणार आहे.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा बौद्ध अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच, साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करावे”, असं आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं नागपुरकरांना केला.
आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी, दरवर्षी लाखो लोक दीक्षाभूमीवर येतात. पण यंदा कोरोनानुळे दीक्षाभूमीवरील सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर न येता, घरीच बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे.
सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. हा दिवस साधेपणाने घरीच साजरा करा. आपल्या घरीच तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करा.#dhammachakkapavattanday pic.twitter.com/Pb2NLfkLVr
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 24, 2020
Dhammachakra Pravartan Din
संबंधित बातम्या :
शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा