नागपुरात भाडेकरु दाम्पत्याकडून घर मालकिणीचं लैंगिक शोषण, पती-पत्नीला अटक

नागपुरात भाडेकरु पती पत्नीने मिळून घर मालकिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला (Nagpur Homeowner Lady Molested by tenant Couple) आहे.

नागपुरात भाडेकरु दाम्पत्याकडून घर मालकिणीचं लैंगिक शोषण, पती-पत्नीला अटक
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 10:29 PM

नागपूर : नागपुरात भाडेकरु पती पत्नीने मिळून घर मालकिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पतीने त्या घर मालकीनीसोबत वारंवार बलात्कार केला. तर पत्नीने समलैंगिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. (Nagpur Homeowner Lady Molested by tenant Couple)

नागपुरात आतापर्यंत एखाद्या महिलेने पुरुषाने लैंगिक शोषण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र एका महिलेनेही महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला राहते. या महिलेच्या घरी रामकिशन जंगीड आणि त्याची पत्नी भाड्याने राहत होते.

रामकिशन जंगीड यांनी या घरमालकीन महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. एवढचं नाही तर जंगीड यांच्या पत्नीनेही त्या महिलेसोबत समलैगिंक संबंध प्रस्थापित केले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

काही दिवसांनी या दाम्पत्याने त्या महिलेचे घर सोडलं. ते दुसरीकडे राहायला गेले. मात्र त्या घरमालक असलेल्या महिलेला घरी बोलवून दोघंही पती पत्नीसोबत वारंवार लैगिंक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी या पती-पत्नीने त्या महिलेला तू आमच्या कुटुंबातील आहे, असं सांगितलं. एवढंच नाही तर स्टॅम्प पेपरवर तिच्याशी लग्न करतो असही जंगीड याने लिहून दिलं.

गेल्या 9 वर्षांपासून सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसात हे दाम्पत्य त्या महिलेला दूर करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्याला कंटाळून तिने पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन जंगीड दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

नागपुरात घडलेली ही घटना अनेकांना अचंबित करणारी आहे. पती पत्नी दोघांनी मिळून महिलेचे लैंगिक शोषण केले. विशेष म्हणजे महिलाही आपल्या पतीला अशा कामात साथ देते. तसेच समलैंगिक संंबंध ठेवते, असा प्रश्न नागपूरकर उपस्थित करत (Nagpur Homeowner Lady Molested by tenant Couple)  आहे.

संबंधित बातम्या : 

नागपुरात शाळकरी मुलांच्या आत्महत्या, एकाचा समोसा न मिळाल्याने, तर दुसऱ्याचा मोबाईल गेमच्या नादाने गळफास

खेळायला गेलेली मुलगी रडत आल्याने आईची चौकशी, चंद्रपूरमध्ये शेजाऱ्याकडूनच अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.