नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. (Nagpur Husband kills wife and her alleged boyfriend suspecting extra marital affair)
नागपुरातील जनता कर्फ्यू संपून काही तास होत नाहीत, तोच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नागपुरातील बेसा परिसरात असलेल्या कल्यानेश्वर नगरमध्ये ही घटना घडली. मयत महिला किरण बरमेया यांचे शिवा नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भारत बरमेया याला होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे.
हेही वाचा : विवाह्यबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या, दुबईत भारतीय तरुणाला जन्मठेप
अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी पतीने पत्नी किरण आणि तिचा मित्र शिवा यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपी पती भारत बरमेयाला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
नागपूरमधील अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
दुसरीकडे, विवाहबाह्य प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या भारतीय तरुणाला दुबईमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी 9 सप्टेंबरला आरोपी पती युगेशने पत्नी विद्या चंद्रनची ऑफिसच्या पार्किंगमध्ये भरदिवसा चाकूने वार करुन हत्या केली होती.
मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू https://t.co/SZ4KbzryK4
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 27, 2020