Temperature | नागपुरात भरली हुडहुडी, तापमानात घट, कसा राहील पुढचा आठवडा?

नागपूरसह परिसरात गेल्या काही दिवसांत तापमानात घट झालीय. थंडी वाढायला लागलीय. विदर्भात येत्या पाच दिवसांत तापमानात आणखी 3 ते 5 पाच डिग्री अंश सेल्सियसपर्यंत घटणार, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवलाय.

Temperature | नागपुरात भरली हुडहुडी, तापमानात घट, कसा राहील पुढचा आठवडा?
थंडी
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 1:59 PM

नागपूर : नागपूरसह विदर्भात थंडी वाढणार आहे. सध्या विदर्भात सरासरी 11 ते 15 तापमान आहे. पुढील पाच दिवसांत पाच अंश तापमान घटणार आहे. विदर्भातील तापमान 10 अंशाच्या खाली जाणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागान व्यक्त केलाय.

नागपूरसह परिसरात गेल्या काही दिवसांत तापमानात घट झालीय. थंडी वाढायला लागलीय. विदर्भात येत्या पाच दिवसांत तापमानात आणखी 3 ते 5 पाच डिग्री अंश सेल्सियसपर्यंत घटणार, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवलाय. नागपूरसह विदर्भात सध्या 11 ते 15 अंश सेल्सिअस सरासरी तापमान आहे. त्यामुळं हुडहुडी भरायला लागलीय. येत्या पाच दिवसांत पारा आणखी घटणार आहे. नागपूरकरांना आणखी गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे. यासोबतच वाढलेल्या थंडीचा रब्बीतील गहू, चणा आणि भाजीवाला पिकालाही फायदा होणार असल्याचं हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी सांगितलंय.

थंडीचा जोर वाढलाय

उत्तरेकडील हवामानाचा विदर्भावर परिणाम जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र आहे. त्यामुळं थंडी वाढायला लागली आहे. विदर्भातील काही भागात किमान तापमानापेक्षा एक ते तीन अंशांची घट होणार आहे. दिवसातील तापमानातही घट होईल. गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घसरण झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहापासून थंडीचा जोर वाढायला लागला आहे. शिवाय दिवसाच्या तापमानातही घट झाली आहे.

पुढील आठवड्यात तापमान कमी होणार

पुढील आठवड्यात थंडीचं प्रमाण आणखी वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दोन-तीन अंश डिग्री सेल्सिअस तापमानात घट होईल. पुढील आठवड्यात 10-11 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी तापमान होईल, असा अंदाज आहे. तर जास्तीत-जास्त तापमान 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आले. आकाश निरभ्र राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पडते तशी थंडी पडली नव्हती. पण, गेल्या दोन दिवसांत विदर्भातील तापमानात घसरण झाली.

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

धक्कादायक! ओबीसींची जनगणनाच झाली नाही, केंद्राचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्रं; भुजबळांचा दावा

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.