नागपुरात सव्वा महिन्यातील मद्यविक्रीचा महसूल अवघ्या 11 दिवसात
गेल्या 11 दिवसांत नागपूर जिल्ह्यातील मद्यविक्रीतून तब्बल 38 कोटी 50 लाखांचा महसूल सरकारला मिळाला. (Nagpur Liquor Revenue during lockdown)
नागपूर : ‘कोरोना’ लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री पुन्हा सुरु झाल्यापासून उत्पादन शुल्क विभागातील महसूल मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. नागपुरात मद्यविक्रीतून अवघ्या 11 दिवसात तब्बल 38 कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. नागपूर जिल्ह्यातून सव्वा महिन्याच्या कालावधीचा महसूल फक्त 11 दिवसात जमा झाला. (Nagpur Liquor Revenue during lockdown)
नागपूर जिल्ह्यात अटीशर्थीसह 14 मेपासून मद्यविक्री सुरु झाली. या मद्यविक्रीमुळे सरकारला केवळ 11 दिवसांत सव्वा महिन्याचा महसूल मिळाला. गेल्या 11 दिवसांत नागपूर जिल्ह्यातील मद्यविक्रीतून तब्बल 38 कोटी 50 लाखांचा महसूल सरकारला मिळाला.
याशिवाय 29 हजारापेक्षा जास्त मद्य परवाने वाटप करण्यात आले. त्यातूनही सरकारला महसूल मिळाला आहे. पूर्वी दिवसाला एक कोटींचा महसूल नागपूर जिल्ह्यातून मिळायचा, पण लॉकडाऊनच्या काळात नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात दारु खरेदी केली. त्यामुळे सव्वा महिन्याच्या कालावधीत जमा होणारा महसूल सरकारच्या तिजोरीत केवळ 11 दिवसांत जमा झाला.
हेही वाचा : मिशन मद्यविक्री, महाराष्ट्राला 28 दिवसात 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित
लॉकडाऊनच्या काळात 18 मार्चपासून उत्पादन शुल्क विभागाने नागपूर जिल्ह्यात धडक कारवाई केली, या कारवाईत तब्बल 429 गुन्हे दाखल झाले असून पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नागपूर अधीक्षक प्रमोद सोनवणे यांनी दिली.
मे महिन्याच्या अखेपर्यंत 2100 कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला अपेक्षित आहे. 4 मेपासून राज्यात मद्यविक्री सुरु झाल्याने 28 दिवसात 2100 कोटी मिळण्याची आशा आहे. भारतात 45 दिवसाहून अधिक काळ ‘लिकर स्टोअर्स’ बंद होती.
VIDEO : टॉप 9 न्यूज https://t.co/p05BUe5bKI
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2020
(Nagpur Liquor Revenue during lockdown)