तुकाराम मुंढेंचे अर्धवट राहिलेले ‘ते’ काम नागपूरचे नवे पालिका आयुक्त नेणार तडीस
नागपूर महापालिकेचे नवे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी डॉन संतोष आंबेकरचा अवैध बंगला पाडण्याचे आदेश दिले.
नागपूर : नागपूर महापालिकेचे नवे आयुक्त राधाकृष्णन बी पदभार स्वीकारल्यापासून अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावर आयुक्तांनी कारवाई केली. याआधी माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आंबेकरच्या एका बंगल्यावर कारवाई केली होती. (Nagpur Municipal Commissioner Radhakrishnan B orders to demolish Don Santosh Ambekar Illegal Bungalow following Tukaram Mundhe steps)
राधाकृष्णन बी यांनी डॉन संतोष आंबेकरचा अवैध बंगला पाडण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या आदेशानंतर आंबेकरचा बंगला पाडण्याची कारवाई सुरु झाली. अडीच हजार स्क्वेअर फूट जागेत असलेल्या अवैध बंगल्यावर पालिकेने कारवाई सुरु केली. संतोष आंबेकरच्या पत्नीच्या नावे चार मजली बंगला आहे.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका बंगल्यावर कारवाई केली होती. विशेष म्हणजे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या महिन्यातच यांनी आंबेकरच्या गडाला सुरुंग लावला होता. संतोष आंबेकरचा नागपूरमधील इतवारी अनधिकृत बंगला होता. आंबेकर याच बंगल्यातून आपली गॅंग चालवत होता.
नागपूर महानगरपालिकेने संतोष आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली होती. मात्र त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नसल्याने तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. एक बंगला जमीनदोस्त झाल्यावर आता आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दुसऱ्या बंगल्यावर कारवाई केली.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला डॉन संतोष आंबेकर यालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. संसर्गानंतर सुरुवातीला काही दिवस त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्यात आले. नंतर त्याच्यावर मेयोमधील कोविड रुग्णालयात उपचार झाले. (Radhakrishnan B Santosh Ambekar Tukaram Mundhe)
लेटलतिफांना दणका
तुकाराम मुंढेंप्रमाणे राधाकृष्णन यांनीही पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच आंबेकरला हादरा दिल्याचे दिसत आहे. नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर मनपा कर्मचारी कार्यालयात पुन्हा उशिरा येऊ लागले होते. त्यामुळे राधाकृष्णन बी. यांनीही तुकाराम मुंढे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनपाच्या तब्बल 66 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.
VIDEO : Special Report | दाऊदच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख?https://t.co/0zMKgiYS08
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
संबंधित बातम्या :
तुकाराम मुंढेंची डॅशिंग कारवाई, गँगस्टर आंबेकरचा अनधिकृत बंगला पाडला
नागपूरच्या नवनियुक्त आयुक्तांचे तुकाराम मुंढेंच्या पावलावर पाऊल, 66 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’
(Nagpur Municipal Commissioner Radhakrishnan B orders to demolish Don Santosh Ambekar Illegal Bungalow following Tukaram Mundhe steps)