नागपूर आयुक्तांचा कामाचा धडाका, कोव्हिड सेंटरला अचानक भेट, नंतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसोबत बैठक

नागपूरचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. (Nagpur Municipal Commissioner Surprise visit Covid center)

नागपूर आयुक्तांचा कामाचा धडाका, कोव्हिड सेंटरला अचानक भेट, नंतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसोबत बैठक
Follow us
| Updated on: Sep 03, 2020 | 9:25 PM

नागपूर : नागपूरचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यानंतर आज त्यांनी नागपुरातील पाचपावली कोव्हिड सेंटरला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी कोव्हिड सेंटर, कोरोना चाचणीची पाहणी केली.  (Nagpur Municipal Commissioner Radhakrishnan B. Surprise visit Covid center)

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज अचानक पाचपावली कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाचपावली सुतीकागृहाची त्यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.

नागपूर शहरात कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेता चाचणीची संख्या आणि वेग वाढवणे आवश्यक आहे. या उद्देशाने मनपा आयुक्तांनी शहरातील कोव्हिड चाचणी केंद्रांची संख्या वाढविली. मात्र यासोबतच चाचणी करताना योग्य खबरदारी घेतली जाते की नाही, तसेच निर्धारित वेळेतच चाचणी केली जाते का, याबाबत आयुक्तांनी चौकशी केली.

यावेळी कोरोना चाचणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून नियमांचे पालन करवून घेतले जाते का? या सर्व बाबींची त्यांनी पाहणी केली.

कोरोना बेड्सची संख्या तात्काळ वाढवा, खासगी रुग्णालयांना आवाहन

त्याशिवाय नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी खासगी रुग्णालयांना कोरोना बेड्सची संख्या तात्काळ वाढवा असे आवाहन केले आहे. नुकतंच याबाबत महापौर आणि आयुक्तांनी डॉक्टरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा केली.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूचा दरही वाढत आहे. मृत्यूसंख्या कमी करायची असेल तर वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खासगी रुग्णालयांनी तात्काळ बेड्‌सची संख्या वाढवावी. आयसीयू बेडची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

नागपुरात कोव्हिड संक्रमणाची भविष्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयांवर पडणारा ताणही वाढला आहे. काही खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता भविष्यात जे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय करण्यासाठी पुढे येईल. त्यांना परवानगी देण्यात येईल, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

पूर्वी शहरात केवळ 20 रुग्णालयांना कोव्हिड रुग्णालय म्हणून परवानगी देण्यात आली होती. आता ही संख्या वाढून 51 झाली आहे, असेही यावेळी स्पष्ट केलं.  (Nagpur Municipal Commissioner Radhakrishnan B. Surprise visit Covid center)

संबंधित बातम्या : 

नागपूरच्या नवनियुक्त आयुक्तांचा तुकाराम मुंढेंच्या पावलावर पाऊल, तब्बल 66 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुकाराम मुंढेंचे ‘छडी लागे छमछम’, कर्मचाऱ्यांसाठी सहा नियमांचं पत्रक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.