तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीनंतर नागपुरातील विकास कामांना ब्रेक, नगरसेवक आक्रमक

तुकाराम मुंढे नागपुरात रुजू झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी अनेक कामांना कात्री (Nagpur Tukaram Mundhe Vs Corporator) लावली.

तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीनंतर नागपुरातील विकास कामांना ब्रेक, नगरसेवक आक्रमक
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 3:31 PM

नागपूर : नागपूरच्या महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाली. तुकाराम मुंढे नागपुरात रुजू झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी अनेक कामांना कात्री लावली. त्यामुळे नागपुरात तुकाराम मुंढे विरुद्ध नगरसेवक संघर्ष सुरू झाला. मात्र काल झालेल्या सभेत सदस्यांनी मुंढेंना धारेवर धरलं आणि मुंढे सभा सोडून निघून गेले. त्यामुळे नागपुरात वातावरण चांगलाच तापलं आहे. (Nagpur Tukaram Mundhe Vs Corporator)

तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे जनप्रतिनिधी आणि मुंढे हा संघर्ष महाराष्ट्राने अनेकदा बघितला आहे. तेच आता नागपुरात घडायला सुरवात झाली आहे. मुंढे हे नागपुरात रुजू होताच महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता त्यांनी अनेक कामांना कात्री लावली. त्यामुळे विकास काम होत नसल्याचे नगरसेवकांची बोंब होती. त्यात कोरोनाचा संकट आलं आणि सगळं काही थांबलं.

मात्र या संकटकाळात देखील मुंढे उपाययोजना राबविताना किंवा निर्णय घेताना जनप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. कोरोनामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा तीन महिन्यांपासून झाली नाही. त्यासाठी महापौर यांनी मुंढेंना पत्र दिलं. मात्र त्यांनी उत्तर न देता ते राज्य सरकारकडे पाठवलं. राज्य सरकारने सभेला परवानगी दिली आणि सभा सुरू झाली. मात्र सभा सुरु होताच नगरसेवकांनी मुंढेवर प्रश्नांचा मारा करायला सुरुवात केली.

काँग्रेसचे हरीश ग्वालबांशी यांनी त्यांच्या परिसरातील व्यापारी संकुलासाठी आरक्षित जागेचा वापर रुग्णालयासाठी करण्याबाबत सभागृह आणि राज्य सरकारची परवानगी घेतली नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यावरुन मुंढे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली आणि मुंढेंनी सभागृह सोडलं.

आयुक्त सभागृह परवानगी न घेता सोडून जाणे ही घटना योग्य नसल्याची टीका त्यांच्यावर झाली. त्यांना ज्या गोष्टीवर नाराजी होती ती बाब कामकाजातून काढता आली असती. पण प्रश्न विचारणे हे नगरसेवकांचं काम असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त करतात.

मुंढे सभागृह सोडत असताना त्यांना महापौरांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते थांबले नाही. गेल्या तीन महिन्यापासून शहरात सभा झाली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. मुंढे यांनी संयम बाळगायला हवा होता. त्यांनी मन मोठं करावं, आम्ही त्यांचं स्वागत करु, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली.

याच सभेत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी आयुक्तांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सुद्धा आणला होता. मात्र तो महापौरांनी फेटाळला. पण आयुक्तांना घेरण्याची तयारी सभागृहात सुरू होती. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर सभागृह बाहेर मात्र मुंढेंच्या समर्थनार्थ एकीकडे युवक काँग्रेस तर दुसरीकडे आम आदमी पार्टी उतरली होती. (Nagpur Tukaram Mundhe Vs Corporator)

संबंधित बातम्या : 

आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, महापौरांचा दावा, आयुक्तांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe | नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर, आयुक्तांनी समजूतदारपणे घ्यायला हवं होतं, महापौरांची प्रतिक्रिया

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.