नागपुरात 15 दांडीबहाद्दर पोलीस निलंबित, कारवाईच्या धसक्याने सुट्टीवर गेलेलेही कामावर परतले
शहर पोलीस दलातील अनेक कर्मचारी सुट्टीवर राहत होते. तर अनेकांनी काम करण्याचा कंटाळा करीत आजारी सुट्ट्या टाकल्या.
नागपूर : सतत कामावर दांड्या मारणाऱ्या 15 पोलीस कर्मचाऱ्यांना आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित (Nagpur Police Commissioner Suspended 15 Police) केले आहे. या कारवाईमुळे कामचुकारांमध्ये खळबळ उडाली आहे. दांडीमार आणि सुट्टीवर असलेल्यांनीही या कारवाईचा धसका घेत ड्युटी जॉईन केली आहे (Nagpur Police Commissioner Suspended 15 Police).
शहर पोलीस दलातील अनेक कर्मचारी सुट्टीवर राहत होते. तर अनेकांनी काम करण्याचा कंटाळा करीत आजारी सुट्ट्या टाकल्या होत्या. तसेच, काहींनी ड्युटी रायटर किंवा मुख्यालयातील अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करीत थेट ड्युटीवर हजर न राहता पगार घेणे सुरु केले होते.
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पोलीस ठाण्यात किंवा कर्तव्यावर नियमित हजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत होता. कर्मचारी तणावात नोकऱ्या करीत होते. ही बाब पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या लक्षात आली.
10 ऑक्टोबरला पोलीस दलातील सतत सुट्टीवर असलेल्या किंवा दांडी मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी त्यांनी मागितली. यादीचा अभ्यास करुन प्रत्येकाचे सुट्टीवर असण्याचे कारण आणि सुट्टीच्या कालावधीचा विचार केला. त्यात आढळलेल्या 15 कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, शिवसेना महिला आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणीhttps://t.co/eQwPMAcS9E@KayandeDr @AnilDeshmukhNCP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2020
Nagpur Police Commissioner Suspended 15 Police
संबंधित बातम्या :