मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला राजकोटमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई
समित ठक्करविरोधात नागपूरच्या सीताबर्डी आणि मुंबईच्या विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये आयटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
नागपूर : ट्विटरवर राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणाऱ्या समित ठक्कर (Nagpur Police Cyber Crime) नामक तरुणाला नागपूर पोलिसांनी राजकोट मधून अटक केली. समित ठक्करविरोधात नागपूरच्या सीताबर्डी आणि मुंबईच्या विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये आयटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे (Nagpur Police Cyber Crime).
नागपूर पोलिसांनी काल (25 ऑक्टोबर) राजकोटमध्ये ठक्करला अटक केली आणि ट्रांजिट रिमांडवर त्याला नागपूरला आणले आहे. समित ठक्कर हा तरुण मूळचा नागपूरचा रहिवाशी असला तरी तो आता मुंबई येथे वास्तव्यास आहे. गेल्या काळात त्याने सत्तात्याने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट या समाज माध्यमांवर केलेल्या आहेत.
या विरोधात नागपुरातील शिवसैनिकांनी ऑगस्ट महिन्यात नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यात तक्रारीं दाखल केल्यानंतर नंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात समित ठक्करविरोधात आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. समितला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 5 ऑक्टोबरला तो मुंबईच्या वी.पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर आला. मात्र, त्यानंतर तो तिथून निघून गेला होता.
त्यानंतर मात्र त्याच्यावर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आता नागपूर पोलिसांनी त्याला राजकोट येथून अटक केली. पुढील तपासाकरिता त्याला मुंबई पोलिसांकडे देखील सोपवले जाऊ शकतं.
धक्कादायक! गाडी अडवली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांनी तलवारीने केले वारhttps://t.co/QTauJujAG8
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2020
Nagpur Police Cyber Crime
संबंधित बातम्या :
पुण्यात पावणे अकरा लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त, कात्रजमध्ये धाडसी कारवाई