नागपुरात कुख्यात गुन्हेगाराला शिताफीने पकडलं, 2 लाखाचे ड्रग्ज जप्त
नागपुरातील कुख्यात गुन्हेगाराला अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा कारवाईदरम्यान ड्रग्जसोबत ताब्यात घेतलं आहे.
नागपूर : नागपुरातील कुख्यात गुन्हेगाराला अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा कारवाईदरम्यान (Nagpur Police Seized Drugs) ड्रग्जसोबत ताब्यात घेतलं आहे. या ड्रग्जची किंमत 2 लाख रुपये असण्याची शक्यता आहे (Nagpur Police Seized Drugs).
कुख्यात गुन्हेगार अब्दुल करीम अजीज शेख उर्फ करीम लाला हा पोलीस लाईन टाकळी परिसरात संशयास्पद रित्या फिरत असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला पकडून त्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्याजवळ 51 ग्राम एमडी पॉवडर आढळून आली. त्यामुळे पथकाने त्याला ताब्यात घेतलं. या ड्रग्जची किंमत 2 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.कुख्यात गुन्हेगार अब्दुल करीम अजीज शेख उर्फ करीम लाला हा पोलीस लाईन टाकळी परिसरात संशयास्पद रित्या फिरत असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली.
करीम पोलीस लाइन टाकळी परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्याची सापळा रचना तयार केली. मात्र, पोलीस दिसताच तो पळायला लागला. पोलिसांनी पाठलाग करुन मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 51 ग्रॅम अर्थात दोन लाख रुपयांची एमडी पावडर जप्त करण्यात आली.
लालाचे मुंबई आणि गुजरात येथील नेटवर्कशी संबंध असल्याचे सांगितले जाते. सोबतच तो कुख्यात गुंड असून त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. मात्र, तो आता ड्रग्ज प्रकारणात अटक झाला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर आता शहरातील तसेच आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागपुरात याआधी सुद्धा एमडी ड्रग्ज संदर्भात कारवाई झाली आहे. त्यामुळे आता या ड्रग्ज विक्रेत्यांनी आपला मोर्चा नागपूरकडे वळविला का, असे प्रश्न उपस्थिती होत आहेत.
पुण्यात पावणे अकरा लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त, कात्रजमध्ये धाडसी कारवाईhttps://t.co/aOcXIx80W7@PuneCityPolice #MephedroneDrug
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2020
Nagpur Police Seized Drugs
संबंधित बातम्या :
भाईचा बड्डे पडला महागात ! बारा मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा
लोकलमधून चोरट्याचा बिनबोभाट प्रवास; मोबाईल चोरताना प्रवाशांकडून चोप; कल्याणमधील धक्कादायक प्रकार
पुणे-बंगळुरु महामार्गावर खासगी बसमधून 3 कोटी 64 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त