‘विक्रम, लवकर उत्तर दे… पावती फाडणार नाही’
सोशल मीडियावर अनेकांनी आपआपल्या पद्धतीने विक्रम लँडरला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी विनवण्या केल्या आहेत. यादरम्यान नागपूर शहर पोलिसांनीही लँडर विक्रमसंबंधी एक ट्वीट केलं (Nagpur Police Tweet on Lander Vikram). हे ट्वीट इतकं रंजक आहे, की ते काहीच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झालं.
नागपूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO)महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ (Chandrayan-2) मोहिमेच्या लँडर विक्रमशी (Vikram Lander) इस्त्रोचे वैज्ञानिक सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत (Vikram lander connection lost). पण, विश्लेशकांच्या मते वेळ निघत चालली आहे आणि त्यासोबतच विक्रमशी संपर्क होण्याची शक्यताही मावळत चालली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर अनेकांनी आपआपल्या पद्धतीने विक्रम लँडरला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी विनवण्या केल्या आहेत. यादरम्यान नागपूर शहर पोलिसांनीही लँडर विक्रमसंबंधी एक ट्वीट केलं (Nagpur Police Tweet on Lander Vikram). हे ट्वीट इतकं रंजक आहे, की ते काहीच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झालं.
‘प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे, आम्ही सिग्नल तोडण्यासाठी तुझं चालान कापणार नाही’, असं ट्वीट नागपूर शहर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं.
Dear Vikram, Please respond ??. We are not going to challan you for breaking the signals!#VikramLanderFound#ISROSpotsVikram @isro#NagpurPolice
— Nagpur City Police (@NagpurPolice) September 9, 2019
नव्या वाहतुकीच्या नियमांनुसार, कुठलाही नियम मोडल्यास चालानमध्ये अनेक पटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात या नव्या नियमांची चर्चा आहे. याच गोष्टीला लक्षात घेत नागपूर पोलिसांनी हे रंजक ट्वीट केलं. सोशल मीडियावर सध्या नागपूर पोलिसांचं हे ट्वीट चांगलचं व्हायरल होत आहे. तर अनेकांनी नागपूर शहर पोलिसांच्या सेंस ऑफ ह्युमरचं कौतुकंही केलं.
नागपूर शहर पोलिसांच्या सेंस ऑफ ह्युमरचं कौतुक
‘बरोबर म्हटलं नागपूर पोलीस, 133 कोटी भारतीयांच्या आशा विक्रमसोबत आहेत आणि नागपूर पोलीस तुमचं ट्वीट असाधारण आहे’, असं एका युझर ने लिहिलं.
Nagpur Police!! Yes, indeed , Hopes of 133 crore Indians attached to #Vikram . It’s truly an exception! And YOUR tweet is EXCEPTIONAL!
— Mallika Kaleem (@MallikaKaleem) September 9, 2019
तर कोणी लिहिलं की, ‘मला माहित आहे नागपूर पोलीस चंद्रावर आहे’.
I knew it.. Nagpur police is on moon…
— स्टॅन ली का पोता पपलु. ? (@papalu_) September 9, 2019
एका ट्विटर युझरने नागपूर पोलिसांच्या विनोदी वृत्तीचं कौतुक करत लिहिलं, ‘ग्रेट सेंस ऑफ ह्युमर’
Great sense of humour ?.
— GujaratBull.com #Nifty #BankNifty #StockOption (@GujaratBull) September 9, 2019
तर एका युझरने लिहिलं, ‘जर विक्रमने प्रतिसाद दिला, तर सिग्नल तोडल्याबद्दल त्याचं चालान मला पाठवा, त्याच्याऐवजी मी भरेल. तुझ्या प्रतिक्षेत #vikaramlander कृपया प्रतिसाद दे’, अशी आर्त हाक या युझरने लँडर विक्रमला दिली आहे.
If Vikram will respond you can send me the Challan for Breaking Signals I will Pay on behalf of Vikram .
Waiting to Hear from You #vikaramlander Please Respond ?#ISROSpotsVikram
— Sunil Gandhi (@Sunpreity) September 9, 2019
शुक्रवारी रात्री संपर्क तुटला
शुक्रवारी (6 सप्टेंबरला)उशिरा रात्री चंद्राच्या दक्षिण धृवावार सॉफ्ट लँडिंगदरम्यान विक्रम लँडर आणि इस्त्रोचा संपर्क तुटला. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2.1 किलोमीटरच्या अंतरावर असताना विक्रम लँडर आणि इस्त्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर चंद्राची परिक्रमा करत असलेल्या ऑर्बिटरने विक्रमचा शोध लावला आणि त्याचे थर्मल फोटोही घेतले. मात्र, अद्यापही विक्रमशी कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही.
ISRO चे वैज्ञानिक विक्रमशी संपर्क करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्ड लँडिंगनंतरही विक्रम लँडर सुरक्षित आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचलेलं नाही. पण, याबाबत इस्त्रोकडून सध्या कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या :
Chandrayaan-2 : नासाकडून कौतुकाची थाप, इस्रोला मोठी ऑफर
#Chandrayaan2 : भारतासाठी मोठा दिलासा! विक्रम लँडरचा शोध लागला, संपर्कासाठी प्रयत्न
Mission Chandrayan-2 : विक्रम लँडरचं चंद्रावर क्रॅश लॅडिंगची शक्यता, इस्त्रो संपर्काच्या प्रयत्नात
Mission Chandrayaan-2 : सोशल मीडियावर ‘भाई लँड करा दे’ हॅशटॅगचा पाऊस