नागपुरात शाळकरी मुलांच्या आत्महत्या, एकाचा समोसा न मिळाल्याने, तर दुसऱ्याचा मोबाईल गेमच्या नादाने गळफास
नागपुरात एका दिवशी दोन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली (Nagpur Two Boys Commit suicide) आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नागपूर : नागपुरात एका दिवशी दोन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली (Nagpur Two Boys Commit suicide) आहे. एका 11 वर्षीय मुलाने समोसा न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. तर दुसरीकडे एका मुलाने मोबाईलवर गेम खेळताना आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. या दोन्ही घटना गिट्टीखदान भागात घडल्या आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यातील पहिल्या घटनेतील 11 वर्षीय विरु शाहू हा मुलगा काटोल मार्गावरील गंगानगरमध्ये आई-वडिलांसह राहत होता. त्याने काल समोसा घेण्यासाठी आईकडे हट्ट केला. आईने त्याला दहा रुपये दिल्यानंतर तो समोसा घेऊन आला. समोसा किचनमध्ये ठेवून तो हात-पाय धुण्यासाठी बाथरुममध्ये गेला.
मात्र त्याच्या मोठ्या भावानं तो समोसा खाल्ला. त्यामुळे चिडून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दुसऱ्या घटनेत योगेंद्रनगर येथील नर्मदा अपार्टमेंटमध्ये 13 वर्षीय राजवीर ठाकूर या मुलानं आत्महत्या केली. त्याचे वडील पोलीस दलात शिपाई आहेत. काही दिवसांपूर्वी शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्याला वडिलांनी मोबाईल आणि टॅब विकत घेऊन दिला होता. शाळेचं काम संपल्यानंतर तो त्यावर गेम खेळायचा.
गेम खेळण्याचं व्यसन लागल्याने तो एकटाच आपल्या खोलीत मोबाईलवर गेम खेळत मग्न राहायचा. मात्र आज सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यात ओढणीनं तयार केलेला फास आणि तो खिडकीला बांधलेला होता. त्याला रूग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याला मोबाईलवर गेम खेळण्याची सवय होती. त्यातून त्यानं आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या दोन्ही घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली (Nagpur Two Boys Commit suicide) आहे.
पैसे न दिल्याने स्ट्रेचर ढकलण्यास वॉर्ड बॉयचा नकार, सहा वर्षाच्या मुलाने आईसह स्ट्रेचर ढकललेhttps://t.co/0biORnJMpX
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2020
संबंधित बातम्या :