मृतदेह दुचाकीला बांधून फरफटत नेला, विहिरीत फेकला, नागपुरात 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून
आरोपीने बंटीचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह दुचाकीला बांधून फरफटत नेण्याचे देखील तपासात समोर आले आहे.
नागपूर : नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यातील सुकळी (Nagpur Youth Murder) गुपचूप शिवारात एका 24 वर्षीय युवकाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतकाचे नाव बंटी शामराव चिडाम असे आहे. आरोपीने बंटीचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह दुचाकीला बांधून फरफटत नेण्याचे देखील तपासात समोर आले आहे. त्यानंतर आरोपीने बंटीचा मृतदेह आणि दुचाकी शेतातील विहिरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे (Nagpur Youth Murder).
या घटनेला एकतर्फी प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
मृत बंटीचा चुलत भाऊ मेघराजने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, काल (6 ऑक्टोबर) दुपारी बंटीसोबत त्याची भेट झाली होती. त्यानंतर बंटी कुणालाही दिसून आला नाही. त्यामुळे त्याचा घरच्यांनी बंटीचा शोध सुरु केला. तेव्हा गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीजवळ एका खांबावर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्याच ठिकाणी असलेल्या विहिरीकडे कुणाला तरी ओढत नेल्याच्या खुणा जमिनीवर दिसून आल्या. त्यानंतर आज (7 ऑक्टोबर) सकाळपासूनच विहिरीच्या आत शोध घेतला जात होता.
स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने गळ पाण्यात टाकून काही सापडतं काय, याचा प्रयत्न केला जात होता. त्यांच्या गळाला बंटीचा मृतदेह आणि दुचाकी लागली. बंटीचा खून कुणी आणि का केला असावा, या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरु केली असता काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्याच्या आधारे पोलिसांनी गावातील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेल्याचं देखील पुढे आले आहे.
Pune Murder | पुण्यात तरुणाला दगडाने ठेचलं, दहा दिवसात कोंढव्यातील तिसरे हत्याकांड https://t.co/ySJAgu64uq #Pune #PuneMurder
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2020
Nagpur Youth Murder
संबंधित बातम्या :
दारुच्या नशेत सतत आईला मारहाण, लातुरात मुलांकडून पित्याची हत्या
पुतण्याला शिवीगाळ केल्यावरुन वाद, नागपुरात घरात घुसून शेजाऱ्याची निर्घृण हत्या