नागपूर ZP निकाल : गडकरी-फडणवीसांना धक्का, काँग्रेसचा एकहाती विजय
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या गडाला महाविकासआघाडीनं सुरूंग लावला (Nagpur ZP election Result) आहे.
नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या गडाला महाविकासआघाडीनं सुरूंग लावला (Nagpur ZP election Result) आहे. नागपूरमध्ये भाजपचा धुव्वा उडवतं जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीने झेंडा फडकवला आहे. महाविकास आघाडीनं 58 पैकी 42 जागा जिंकल्या. यात काँग्रेस 30, राष्ट्रवादी 10, शिवसेना 1 आणि शेकाप 1 जागांवर विजयी झाली आहे. तर भाजपला 15 जागांवर ताबा मिळवता आला (Nagpur ZP election Result) आहे.
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झाले आहेत. राष्ट्र स्वयं सेवक संघांचं मुख्यालय असणाऱ्या नागपुरातील भाजपच्या पराभवाच्या कारणं अनेक आहेत.
भाजप पाच वर्षे सत्तेत असताना जनतेते रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागपूरमध्ये भाजपमधील पक्षांतंर्गत बेवनाव पाहायला मिळत आहे. त्याशिवाय विधानसभा निवडणुकांच्या भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नाराजीचा फटका बसला (Nagpur ZP election Result) आहे.
तर दुसरीकडे महाविकासाआघाडीकडून नागपूर जिल्हा परिषदेच्या प्रचाराची जबाबदारी 3 कॅबिनेट मंत्र्यांकडे देण्यात आली होती. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुखांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. राज्यातील सरकार परिवर्तनाचा नागपूर जिल्हा परिषद निवडणुकींवर परिणाम पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडीचं सरकार असल्यानं जिल्हा परिषद सत्ता काबीज करणं सोप्प झालं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपच्या घरच्या मैदानावर फडणवीस आणि गडकरींना धोबीपछाड मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्राची घोषणा देणाऱ्या फडणवीस आणि गडकरींचा नागपूर आता भाजपमुक्त झाला (Nagpur ZP election Result) आहे.
नागपूर जिल्हा परिषद निकाल
नागपूर जिल्हा परिषद एकूण जागा : 58 महाविकास आघाडी : 42 काँग्रेस : 30 राष्ट्रवादी : 10 शिवसेना : 1 शेकाप : 1 भाजप : 15 अपक्ष : 1