मराठवाड्यातील दुष्काळ आणि स्थलांतराची चिंता वाटते : नाना पाटेकर
पुणे : अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘नाम फाऊंडेशन’च्या खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाला नानांनी हजेरी लावली. ग्रीन थंब आणि सरकारचा हा संयुक्त उपक्रम आहे. यावेळी अभिनेता मकरंद अनासपुरे आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी नानांना देशी गायीची […]
पुणे : अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘नाम फाऊंडेशन’च्या खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाला नानांनी हजेरी लावली. ग्रीन थंब आणि सरकारचा हा संयुक्त उपक्रम आहे. यावेळी अभिनेता मकरंद अनासपुरे आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी नानांना देशी गायीची अनोखी भेट दिली. नामच्या वतीने गाळ काढण्यासाठी पाच पोकलेनची मदत करण्यात आली आहे.
यावेळी नाना पाटेकर यांनी दुष्काळ, पर्यावरण आणि मराठवाड्यातील स्थलांतरावर चिंता व्यक्त केली.
राज्यात यंदा दुष्काळ असून मराठवाड्यात भयंकर परिस्थिती आहे. नागरिक स्थलांतर करीत असून शहरात त्यांना मदतीचा हात देण्याचं अवाहन नानांनी केले. मराठवाड्यातील नागरिकांना एक मुठ धान्य आणि एक पेंड चारा देण्याची गरज नानांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर एखाद्या गरीबाच्या तोंडात दोन घास गेल्यावर मला देवळात गेल्यासारखं वाटते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हास्य महत्वाचं आहे. तुला मंदिर बांधायचं असेल तर तू बांध. कोणाला काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपल्या सोईने करायचे, असे नानांनी म्हटले.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मोर्चावर बोलताना, गरजा पूर्ण झाल्यावर ते येणार नाहीत. कोणतेही सरकार चांगल्यासाठी काम करते, मात्र ते अपुरे असल्याने सेवाभावी संस्थांनी मदत करण्याचे अवाहन नानांनी यावेळी केले.