महायुतीचे दिवस भरलेत, म्हणूनच आम्ही मैदानात…; कुणी दिलं थेट आव्हान?

B D Chavan on Mahayuti and Hingoli Loksabha Election 2024 : महायुतीवर घणाघाती टीका; लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवाराचा घणाघात... कुणी केली ही टीका? हिंगोली लोकसभेच्या लढतीवर काय म्हणाले? वंचितच्या उमेदवाराचा महायुतीवर टीकास्त्र. नेमकं काय म्हणाले? वाचा...

महायुतीचे दिवस भरलेत, म्हणूनच आम्ही मैदानात...; कुणी दिलं थेट आव्हान?
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 9:03 AM

शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीतील उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपची नाराजी आहे. महायुतीचे दिवस भरले आहेत. पापाचा अंत कुठेतरी होते आणि त्याचा अंत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात आली आहे, असं बी. डी. चव्हाण म्हणाले. वंचित कडून हिंगोली लोकसभेसाठी डॉ. बी. डी. चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड येथील बी. डी. चव्हाण यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हिंगोलीची जागा वंचित बहुजन आघाडी जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी हिंगोली लोकसभेसाठी उमेदवार दिला आहे. त्यावर बी. डी. चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी जन मोर्चाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे बोलणं सुरू आहे. हिंगोली लोकसभेला दिलेला ओबीसीचा उमेदवार प्रकाश शेंडगे मागे घेतील, असा विश्वासही बी. डी. चव्हाण यांनी व्यक्त केला.

“वंचित जिंकणारच”

सर्व ओबीसी, वंचित आणि पीडित घटकांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मतदान करावं. महाराष्ट्रातील दीड करोड बंजारा समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचे ऋण व्यक्त करतो. हिंगोली लोकसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं बी. डी. चव्हाण म्हणाले.

वंचित आता हिंगोली सेंटर प्लेसमध्ये आली आहे. आम्हाला जे बी टीम म्हणत होते. त्यांना आता दाखवतो ए टीम एम कोणती आणि बी टीम कोणती ते… आमची सगळ्यांना विनंती आहे. तुमचं भांडण तुमच्या जागेवर ठेवा आणि आम्हाला मदत करा. आम्हाला 1000% विजयाची खात्री आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे. पण प्रस्थापितांना आता लोक स्वीकारत नाहीत. गरीब मराठा सुद्धा वंचितला मतदान करेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज कधी भरणार?

3 तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. डफड्याच्या तालावर मिरवणूक निघणार आहे. उमेदवारी भरायला आंबेडकरी घराण्यातील कोणीतरी यावं, असे मी प्रकाश आंबेडकरांना विनंती करणार आहे. माझ्या आयुष्यात मला इतका आनंद कधी झाला नाही. माझ्यासारख्या तांड्यातल्या माणसाला संसदेत जायचं म्हणल्यावर कोणाला आनंद वाटणार नाही? मी प्रचंड आनंदी आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानतो, असं डॉ. बी. डी. चव्हाण यांनी म्हटलं.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.