पाहणी नको, तात्काळ मदत द्या…! मंत्री विजय वडेट्टीवारांसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी

नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमोर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं.

पाहणी नको, तात्काळ मदत द्या...! मंत्री विजय वडेट्टीवारांसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 11:45 AM

नांदेड: परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आता सरकारमधील मंत्री मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पोहोचत आहेत. मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार आज नांदेड दौऱ्यावर आहेत. मात्र, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना विजय वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मुखेड तालुक्यातील सलगरातील शेतकऱ्यांनी वडेट्टीवारांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली. पाहणी दौरे थांबवा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. (Vijay Wadettiwar inspects rain damage in Nanded)

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नांदेडमधून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आहेत. परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, उसाचं मोठं नुकसान झालं आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. महाविकास आघाडी सरकार खंबिरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी वडेट्टीवारांनी शेतकऱ्यांना दिली. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यापूर्वी वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले.

कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करु- वडेट्टीवार

परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीनं करु. तसंच कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करु, असं आश्वासन मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिलं होतं. तसंच झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रानंही एक पथक पाठवण्याची मागणी करतानाच केंद्रानंही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

बाळासाहेबांचा वारस असल्याचे सिद्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा; विनायक मेटेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

बाळासाहेबांचा वारस असल्याचे सिद्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा; विनायक मेटेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

शरद पवारांची बळीराजाशी ‘मन की बात’; गाडी थांबवून ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Vijay Wadettiwar inspects rain damage in Nanded

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.