Dabholkar murder case : ठाण्याजवळच्या खाडीतून पिस्तुल शोधलं, नॉर्वेच्या जलतरणपटूंना यश

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात सीबीआयला (Narendra Dabholkar murder pistol recover) आणखी एक यश मिळालं आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल सापडले.

Dabholkar murder case : ठाण्याजवळच्या खाडीतून पिस्तुल शोधलं, नॉर्वेच्या जलतरणपटूंना यश
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 11:56 AM

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात सीबीआयला (Narendra Dabholkar murder pistol recover) आणखी एक यश मिळालं आहे. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल सापडल्याचा दावा करण्यात  आला आहे. हे पिस्तुल ठाण्याजवळच्या खाडीत फेकून देण्यात आलं होतं. ते पिस्तुल नॉर्वेच्या जलतरणपटूंनी शोधून काढलं. ठाण्याजवळच्या खारेगाव खाडीतून (Narendra Dabholkar murder pistol recover) हे पिस्तुल शोधून काढण्यात आलं. सीबीआयने हे पिस्तुल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं आहे. तपासणी अहवालानंतरच हे पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलं होतं की नाही ते समोर येईल.

दुबईची एन्विटेक मरीन कन्सल्टेशन पिस्तूल शोधत होती. या कंपनीने नॉर्वेमधून खास मशिन्स आणल्या होत्या. या मशिन्स भारतात आणताना 95 लाखांचे आयातशुल्क माफ करण्यात आलं होतं. खोल खाडीतील पिस्तुल लोहचुंबकाच्या मदतीने शोधून काढलं. पिस्तुल शोधण्यासाठी तब्बल 7.5 कोटी रुपयांचा खर्च आला. हे पिस्तुल शोधण्यासाठी सात विविध पद्धतींचा वापर करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी अनेक वर्षापासून तपास सुरु आहे. मात्र अद्याप मुख्य आरोपी सापडलेला नाही. आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दाभोलकर हत्येत वापरलेली एक पिस्तुल शोधून काढल्याचा दावा केला आहे.

दाभोलकरांच्या हत्येमध्ये खरंच हे पिस्तुल वापरलं गेलं होतं का याचा तपास करण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे. ऑगस्ट 2019 मध्ये सीबीआयने पुणे कोर्टाला माहिती दिली होती की शस्त्राचा शोध घेण्यासाठी ठाण्याजवळील खारेगाव खाडी येथील समुद्राचं पाणी ओसरणे आवश्यक आहे.

सीबीआयने दाभोलकर हत्येप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांच्यासह सात जणांना अटक केली होती.  नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्तुलांची विल्हेवाट लावल्याचा दावाही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला होता.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. 2016 मध्ये सनातनशी संबंधित असलेल्या वीरेंद्र तावडेवर आरोपपत्रही दाखल झालं होतं.

पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोलकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असंही समोर आलं होतं.

संबंधित बातम्या 

डॉ. दाभोलकर हत्या : पुनाळेकर आणि भावेला 4 जूनपर्यंत CBI कोठडी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.