व्हिएन्ना गोळीबाराचा जगभरातून निषेध, भारत कठीण प्रसंगी ऑस्ट्रियासोबत ठामपणे उभा: पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोळीबाराचा निषेध केला आहे. गोळीबारात सात जण आणि एक हल्लेखोर ठार झाला आहे. ( Narendra Modi and Donald Trump condemned fire incident at Vienna city in Austria )
नवी दिल्ली: युरोपातील ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहराच्या मध्यभागी यहुदी उपासनागृहाजवळ झालेल्या गोळीबारात सात जण आणि एक हल्लेखोर ठार झाला आहे. हा गोळीबार व्हिएन्ना शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी झाला. या गोळीबाराचा जगभरातून निषेध करण्यात येतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोळीबाराचा निषेध केला आहे. “व्हिएन्नातील दहशतवादी हल्ल्यामुळं धक्का बसला. भारत या दु:खद प्रसंगी तुमच्या सोबत आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी गोळीबारात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांच्याबद्दल संवदेना व्यक्त केल्या आहेत. ( Narendra Modi and Donald Trump condemned fire incident at Vienna city in Austria )
Deeply shocked and saddened by the dastardly terror attacks in Vienna. India stands with Austria during this tragic time. My thoughts are with the victims and their families.
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2020
फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनकडून गोळीबाराचा निषेध
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युअल मॅक्रॉन यांनी देखील ऑस्ट्रियाच्या नागरिकांसोबत असल्याचे म्हटले आहे. “आमच्या दुश्मनांनी कुणासोबत लढत आहोत हे लक्षात घ्यावं. आम्ही झुकणार नाही, असं मॅक्रॉन म्हणाले. आमच्या आणखी एका मित्र राष्ट्रावर हल्ला झाला आहे. युरोप आमचा आहे, हे दुश्मनांनी लक्षात ठेवावं”, असं मॅक्रॉन म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोळीबारात जीव गमवालेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त केल्या. “निर्दोष लोकांवर होणाऱ्या क्रुर हल्ल्यांना रोखायला हवं, असं ते म्हणाले. अमेरिका कट्टरपंथी इस्लामी दहशतावादाविरुद्ध ऑस्ट्रिया आणि फ्रान्स सह युरोपसोबत उभा आहे”, असं ट्रम्प म्हणाले.
Our prayers are with the people of Vienna after yet another vile act of terrorism in Europe. These evil attacks against innocent people must stop. The U.S. stands with Austria, France, and all of Europe in the fight against terrorists, including radical Islamic terrorists.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 3, 2020
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देखील ऑस्ट्रियामध्ये झालेल्या गोळीबाराचा निषेध केला. व्हिएन्नामधील गोळीबारामुळं स्तब्ध आहे. ब्रिटन याप्रसंगी ऑस्ट्रियासोबत उभा आहे, असं जॉनसन म्हणाले आहेत.
I am deeply shocked by the terrible attacks in Vienna tonight. The UK’s thoughts are with the people of Austria – we stand united with you against terror.
— Boris Johnson (@BorisJohnson) November 2, 2020
व्हिएन्नातील 6 ठिकाणी गोळीबार
दरम्यान, स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) व्हिएन्ना शहराच्या मध्यभागी ज्यूंच्या एका उपासनागृहाच्या शेजारी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सात जण ठार झाले. स्पुतनिकच्या वृत्तानुसार, पोलिसांनी हल्लेखोरांपैकी एकाला मारले, परंतु त्याचे साथीदार तेथून पळून गेले.
व्हिएन्ना शहर पोलिसांनी गोळीबाराची खातरजमा केली असून, त्यात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगितले. व्हिएन्ना पोलीस विभागाने ट्विटरवर म्हटले आहे की, व्हिएन्ना इनर सिटी जिल्ह्यात पोलीस मोठी कारवाई करीत आहेत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ज्यू यहूदी उपासनागृहाजवळ रस्त्यावर जवळपास 50 गोळ्यांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा ठिकाणी हल्ला झाला. अनेक हल्लेखोरांनी रायफल्सनी गोळीबार केला. गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. तर एका हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
ऑस्ट्रिया: व्हिएन्ना येथे झालेल्या गोळीबारात सात ठार, अनेक जखमी, हल्लेखोराचा खात्मा
भेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण काय?
( Narendra Modi and Donald Trump condemned fire incident at Vienna city in Austria )