Nashik Corona Update | नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता कहर, मालेगावातील आकडा 500 च्या उंबरठ्यावर
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Nashik District Corona Update) आहे. आज आणखी 50 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
नाशिक : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Nashik District Corona Update) आहे. नाशिकमध्येही कोरोना विषाणूचा हाहाकार पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात आज (9 मे) आणखी 50 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 600 पार गेला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Nashik District Corona Update) आहे. नुकतंच नाशिक जिल्ह्यात 50 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक 49 रुग्ण हे मालेगावमधील आहेत. तर एक रुग्ण नाशिक शहरात आढळला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 622 वर पोहोचली आहे.
तर नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 19 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मालेगाव शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा 497 वर पोहोचला आहे. तर नाशिक शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 45 वर पोहोचला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजारवर
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 19 हजार 063 वर पोहोचली आहे. काल (8 मे) दिवसभरात 1 हजार 089 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात आज 169 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 3,470 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
तर राज्यात 37 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळीची एकूण संख्या 731 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 25, पुण्यातील 10, जळगावमधील 1 आणि अमरावती शहरातील एकाचा समावेश (Nashik District Corona Update) आहे.
संबंधित बातम्या :
औरंगाबादेत कोरोनाचा कहर, दिवसाच्या सुरुवातीलाच 17 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 494 वर
Pune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पाच दिवसांवरुन 10 दिवसांवर