Nashik Rain | पहिल्याच पावसात गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली, नदी पात्रात वाहनं अडकली
नाशकात बहुतेक भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली. गोदावरी नदीने पहिल्याच पावसात धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नाशिक : नाशकात बहुतेक भागात (Nashik Flood In Godavari River) आज पावसाने दमदार हजेरी लावली. गोदावरी नदीने पहिल्याच पावसात धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी दुथडी भरुन वाहू लागली आहे. अचानकपणे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रात उभी असलेली वाहनं (Nashik Flood In Godavari River) पाण्यात अडकली.
गेल्यावर्षीही गोदावरी नदीला पूर आला होता. मात्र, तरीही प्रशासनान सज्ज नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
नाशकात आज मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे गोदावरी नदी दुधडी भरुन वाहू लागली. गोदावरीला अचानक आलेल्या पुरामुळे गाडगे महाराज पुलाखाली 6 ते 7 चारी चाकी वाहन अडकून पडली. मात्र, पहिल्याच पावसात गोदावरीला पूर आल्यामुळे गोदा प्रेमींकडून महानगर पालिकेच्या नाले सफाईच्या कामांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यात मान्सूनचं धडाक्यात आगमन
राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू महाराष्ट्र व्यापण्याकडे कूच करत आहे. तळकोकणाच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यातील परभणीतही विक्रमी पाऊस झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्गात कालपासून सतत पाऊस पडत असून या पावसाचा किनारपट्टी भागात मोठा जोर आहे. (Nashik Flood In Godavari River )
#Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊसhttps://t.co/PUs1cTlkyt
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2020
देवगड तालुक्यात पावसाचा जोर अधिकच असून मागील 24 तासात देवगडमध्ये 140 मिमी पाऊस पडला. या पावसाने दहीबाव येथील अन्नपूर्णा नदीला पूर आला असून नदीच्या आसपास सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे या पुलावरुन जाणार दहीबाव-आचरा रस्ता बंद झाला आहे. तसेच, परभणी, औरंगाबाद, मराठवाडा, अकोला, जालना, अमरावती वर्धा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
Nashik Flood In Godavari River
संबंधित बातम्या :
नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुढेंकडून लॉकडाऊनचा वेळ सार्थकी, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण
विदर्भात पेरणीला सुुरुवात, शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी, सोयाबीनकडे कल जास्त
Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊस