Liquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश

'टीव्ही9 मराठी'कडे आनंद व्यक्त करणारा नाशिकचा मद्यप्रेमी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता (Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil orders to close wine shops)

Liquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 5:35 PM

नाशिक : नाशिकच्या पठ्ठ्याने एका दिवसात 7 ते 8 क्वार्टर रिचवण्याचा निर्धार व्यक्त करुन चार तास उलटत नाहीत, तोच नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी छडी उगारली आहे. नाशकात दारुच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींची गर्दी वाढल्याने शहरातील सर्व वाईन शॉप बंद करण्याचे आदेश नांगरे पाटलांनी दिले आहेत. (Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil orders to close wine shops)

महाराष्ट्रात कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही मद्यविक्रीला आजपासून (सोमवार 4 मे) सशर्त परवानगी मिळाली. त्यामुळे राज्यभरातील वाईन शॉप्सवर तळीरामांनी सकाळपासून गर्दी केली होती. दारु खरेदीसाठी रांगा वाढल्याने पोलीस आयुक्तांनी सर्व वाईन शॉप्स बंद करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा –  मी आज 7 ते 8 क्वार्टर पिणार, कसर भरुन काढणार, नाशिकच्या पठ्ठ्याचा निर्धार

नाशिक शहरात अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली करत वाईन शॉप सुरु होते. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील वाईन शॉप्स बंद राहतील, असे फर्मान नांगरे पाटलांनी काढले आहेत.

“मी आज 7 ते 8 क्वार्टर पिणार, कसर भरुन काढणार”

‘टीव्ही9 मराठी’कडे आनंद व्यक्त करणारा नाशिकचा मद्यप्रेमी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. “दादा किती मी सांगू तुला आता आनंद झालाय मला. दारुची दुकान उघडणार हे ऐकल्यानंतर मला इतका आनंद वाटतोय. मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. याआधी मला इतका आनंद कधीही झालेला नाही,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती. आता या ‘दादा’ला मनसोक्त क्वार्टर मिळाल्या, की आधीच त्याच्या स्वप्नांवर पाणी पडलं, हे अद्याप समजलेलं नाही. (Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil orders to close wine shops)

“दारुची दुकानं आजपासून सुरु होणार आहेत. मी आज कमीत कमी 12 ते 13 क्वार्टर विकत घेणार आहे. यातील 7 ते 8 आज पिणार आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून मी आज थांबलो होतो. ती सर्व कसरत मी आज भरुन काढणार आहे.” असं सांगताना त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.

हेही वाचा – हातात पिशव्या घेऊन अर्धा किमी रांगा, पुण्यात वाईन शॉप्स न उघडल्याने तळीराम हिरमुसले

“एवढंच नव्हे तर कमीत कमी तीन ते चार किलो बकऱ्याचं मटण घेणार आहे. त्यातील दोन किलो मटणाची भाजी करणार आणि दोन किलो सुकं मटण खाणार आहे. यानंतर मी छान आरामात झोपणार आहे आणि त्यानतंर तीन दिवसांनी मी उठणार आहे,” असंही हा पठ्ठ्या ‘टीव्ही 9 मराठी’ला म्हणाला होता.

संबंधित बातम्या :

तळीरामांचा बांध फुटला, एकमेकांना चिकटून रांगा, दारुच्या मज्जेसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नाशिकमध्ये वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पोलिसांकडून लाठीचार्ज

(Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil orders to close wine shops)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.