Nashik Corona | नाशिकमध्ये संचारबंदीतही नागरिक बेफिकीर, दोन कोटींचा दंड, 17 हजार नागरिकांवर कारवाई
संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक तसेच इतर नागरिकांवर आतापर्यंत तब्बल दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नाशिक : नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता (Nashik Police Take Action), पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केलीआहे. मात्र, काही नागरिक शासकीय आदेश धुडकावत विनाकारण शहरात फिरताना दिसत आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत. यादरम्यान, संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक तसेच इतर नागरिकांवर आतापर्यंत तब्बल दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई गेल्या महिन्याभरातील आहे (Nashik Police Take Action).
विना मास्क फिरणाऱ्या 17 हजार नागरिकांवर कारवाई
त्याशिवाय, शहरात विना मास्क सर्रासपणे फिरणाऱ्या 17 हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जर अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण फिरु नका असं आवाहन वारंवार पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नाशिक शहरात सायंकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणालाही घरा बाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र, तरीही पहिल्याच दिवशी (3 जुलै) काही नागरिकांनी नियमांचं उल्लंघन केलं (Nashik Police Take Action).
पहिल्याच दिवशी 1400 नागरिकांवर कारवाई
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अशा 1400 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे आहे. यामध्ये बाहेर फिरणारे 900 तर मास्क न घालता फिरणाऱ्या 500 नागरिकांचा समावेश आहे. यांच्यावर 188 कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये जनजागृतीसाठी पोलीस सायकलवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अनोखा उपक्रमhttps://t.co/4BjrHaClLP#Pune #CoronaAwareness #CoronaEffect
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2020
Nashik Police Take Action
संबंधित बातम्या :
राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोना, 93 पोलिसांचा मृत्यू