Nashik | अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मिळाली 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. येवला, इगतपुरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावाली. त्यामुळे कांदा, गहू, मकासह इतर पीक जमीनदोस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Nashik | अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मिळाली 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई
नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 12:49 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) अतिशय दिलासादायक बातमी. नाशिक जिल्ह्यात साधरणतः दीड वर्षापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस (Rain), अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई मदत प्राप्त झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट – सप्टेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त एकूण 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या तालुक्याला किती निधी?

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याला 15 कोटी 24 लाख, नांदगाव तालुक्याला 15 कोटी 74 लाख, देवळा तालुक्याला 83 हजार, सुरगाणा तालुक्याला 4 लक्ष 56 हजार, त्र्यंबकेश्वर तालुक्याला 95 हजार, इगतपुरी तालुक्याला 3 लाख 17 हजार, पेठ तालुक्याला 3 लाख 72 हजार तर निफाड तालुक्याला 1 कोटी 17 लाख रुपये असा एकूण नाशिक जिल्ह्यातील आठ नुकसानग्रस्त तालुक्यांना 32 कोटी 29 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सध्याही अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या अनेक गोरगरिब, कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुन्हा अवकाळी हजेरी

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. येवला, इगतपुरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावाली. त्यामुळे कांदा, गहू, मकासह इतर पीक जमीनदोस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. याची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

तालुकानिहाय निधी

येवला – 15 कोटी 24 लाख नांदगाव – 15 कोटी 74 लाख देवळा – 83 हजार सुरगाणा – 4 लक्ष 56 हजार त्र्यंबकेश्वर – 95 हजार इगतपुरी – 3 लाख 17 हजार पेठ – 3 लाख 72 निफाड – 1 कोटी 17 लाख एकूण – 32 कोटी 29 लाख

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.