शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोना, कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ

नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाली (Shivsena MLA Narendra Darade Corona Positive) आहे.

शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोना, कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 5:03 PM

नाशिक : वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे नाशिकमधील येवला शहर कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं (Shivsena MLA Narendra Darade Corona Positive) आहे. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांसह इतर अधिकाऱ्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य आमदार नरेंद्र दराडे हे येवला शहरात राहतात. काही दिवसांपूर्वी ते नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांना समजले. यानंतर दराडे यांनी तातडीने कोरोना तपासणी केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्या तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दराडे यांनी उपचारासाठी मुंबईत धाव घेतली. त्यांच्यावर पुढील तपासणीनंतर लीलावती किंवा फोर्टिस रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली.

नरेंद्र दराडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दराडे हे कार्यकर्त्यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते. यामुळे येवला शहरातील शिवसैनिकांमध्येही चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

येवल्यात कोरोनाचा आकडा वाढताच

दरम्यान येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या 205 वर पोहचली आहे. यात 168 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आहे. तर आतापर्यंत 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 21 कोरोना बाधितांवर उपचार सुरु (Shivsena MLA Narendra Darade Corona Positive) आहे.

संबंधित बातम्या : 

भाजप आमदाराचा प्लाझ्मादानाचा निर्धार, कोरोनामुक्त होताच घोषणा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.