18 तासांची झुंज अपयशी, नाशिकमधील विहिरीत पडलेल्या एसटीतून अखेर बाळाचा मृतदेह बाहेर

नाशकात एसटी आणि रिक्षाच्या अपघातानंतर लहान बाळ विहिरीत अडकल्याची माहिती बचाव पथकाला देण्यात आली होती.

18 तासांची झुंज अपयशी, नाशिकमधील विहिरीत पडलेल्या एसटीतून अखेर बाळाचा मृतदेह बाहेर
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 11:50 AM

नाशिक : नाशिकमधील एसटी आणि अॅपे रिक्षाच्या अपघातानंतर विहिरीत पडलेल्या बाळाचा मृतदेहच अखेर हाती आला. एनडीआरएफच्या पथकाने केलेली 18 तासांच्या प्रयत्नांची शिकस्त अखेर व्यर्थ (Nashik ST Bus Baby Rescue) ठरली. एसटी-रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 26 वर पोहचला आहे.

अपघातग्रस्त एसटीमधील लहान बाळ विहिरीत अडकल्याची माहिती बचाव पथकाला देण्यात आली होती. त्यानुसार अपघाताच्या दिवशी (मंगळवारी) रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. मात्र अंधारामुळे अडथळे आल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली.

एनडीआरएफच्या जवानांनी आज (बुधवारी) सकाळीच बचावकार्याला पुन्हा सुरुवात केली, मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. एसटीमध्ये अडकलेल्या बाळाला बाहेर काढलं, तोवर त्याचा श्वास बंद झाला होता.

एसटी-रिक्षाच्या भीषण अपघातात सख्ख्या भावांवर काळाचा घाला, जावा बचावल्या

नाशिकमध्ये एसटी आणि अॅपे रिक्षामध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातातील मृतांचा आकडा 26 वर पोहचला आहे. अपघातानंतर दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली होती. मालेगाव-देवळा रस्त्यावर झालेल्या अपघातात 35 जण जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी एसटीतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य राबवलं होतं.

कसा झाला अपघात ?

कळवण डेपोची उमराणे-देवळा एसटी बस मालेगावहून धोबीघाट मेशीकडे जात होती. धोबीघाट परिसरात देश-विदेश हॉटेलजवळ एसटी आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रिक्षावर धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस आणि रिक्षा ही दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

बसची मागील काच फोडून बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तसेच, बस आणि रिक्षाला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. या अपघातात 25 जणांचा नाहक बळी गेला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना मालेगाव देवळा येथील रुग्णालयात, तर काहींना उमराणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik ST Bus Baby Rescue

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.