नाशिक : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 हजार 401 वर (Nashik New Born baby Corona) पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना गेल्या 48 तासात दोन नवजात बाळांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पालकांची धास्त वाढली आहे. या नवजात बाळांसाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने (Nashik New Born baby Corona) वाढतो आहे. तर दुसरीकडे या संकटात आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण होत असली तरी नवजात बाळांनाही कोरोनाने ग्रासलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 693 पर्यंत पोहोचला आहे. यात निफाडच्या विंचूर या ठिकाणच्या दोन दिवसांच्या बाळाला कोरोना झाला आहे. तर मालेगावमधील चंदनापुरीतील 10 दिवसांच्या चिमुरडीला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. तर जवळपास 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध लोकांना आणि लहान बाळांना जास्त आहे असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. सांगत आहे. या धोक्यापासून विशेष करुन लहान मुलांचा बचाव कसा करावा हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना आता नवजात बाळांना देखील याचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासोबतच पालकांची देखील चिंता वाढली आहे. मात्र याबाबत गरोदर महिलांनी किंवा प्रसूती झालेल्या मातांनी विशेष काळजी घेणे गरजेचे (Nashik New Born baby Corona) आहे.
संबंधित बातम्या :
बेस्टच्या 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 70 टक्के कर्मचारी विलगीकरणात
कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर