Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर

लासलगावसह सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यशस्वीरित्या सुरू राहण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाची तरतूद यात करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या विजेचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.

Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर
मंत्री छगन भुजबळ आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मान्यतेची प्रत सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समितीकडे सुपूर्द केली.
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 2:47 PM

नाशिक: लासलगाव विंचूरसह 16 गावांसाठी वरदान ठरलेल्या सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरण प्रस्तावाला जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या रेट्रोफिटिंग अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. सोबतच योजनेच्या नूतनीकरणास 17 कोटी 54 लाख रुपयांच्या निधीस देखील शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या सोळागावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या योजनेच्या कामासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता.

या गावांना फायदा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मान्यतेची प्रत सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समितीकडे सुपूर्द केली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच तथा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, पांडुरंग राऊत यांच्यासह पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. या मंजुरीमुळे लासलगाव, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, विष्णूनगर, डोंगरगाव, नांदगाव, कोटमगाव, टाकळी विंचूर, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव विर, ब्राम्हणगाव विंचूर, पिंपळगाव नजिक, निमगाव वाकडा, हनुमाननगर या गावांचा लाभ होणार आहे.

पाईपलाईन जुनी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव, विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात 2010 पासून कार्यान्वित करण्यात येऊन सदर योजना 2012 मध्ये संयुक्त पाणीपुरवठा समितीकडे देखभालदुरुस्ती व योजना यशस्वीरित्या चालविण्यासाठी हस्तांतरित करण्यात आली होती. ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या सोळा गावांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे. सदर योजनेची पाईपलाईन जुनी झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजचा सामना करावा लागत होता. त्यामुळे योजना चालविणे अतिशय कठीण बनले होते. मंत्री छगन भुजबळ यांनी या योजनेच्या नूतनीकरणासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार योजनेच्या नूतनीकरणास मंजुरी मिळाली आहे.

99 हजार 901 लोकसंख्या अवलंबून

लासलगाव, विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा मूळ योजना 2031 पर्यंत एकूण संकल्पित 99 हजार 901 लोकसंख्येकरिता मंजूर करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मुख्य दाबनलिकेसाठी 457 मी.मी व्यासाचे एम.एस.पाईप वापरण्यात आले आहेत. एकूण लांबीपैकी साधारण 5500 मी. पाईपलाईन जमिनी खालून टाकलेली असल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर नियमित लिकेज होते. त्यामुळे योजनेचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत होता. जलजीवन मिशन कार्यक्रमामधील रेट्रोफिटिंग अंतर्गत पूरक पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे व त्या प्रमाणे अंदाजपत्रके व आराखडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते.

सौरऊर्जा प्रकल्पाची तरतूद

केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमामध्ये रेट्रोफिटिंग अंतर्गत वाढीव लासलगाव विंचूर व इतर सोळागावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी 17 कोटी 56 लाख इतक्या निधीस मंजुरी दिली आहे. या योजनेच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यशस्वीरित्या सुरू राहिण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाची तरतूद यात करण्यात आली आहे. त्यामुळे विजेचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून कार्यान्वित झालेली सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा वरदान ठरली आहे. सदर योजनेच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या सोळागावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सौरऊर्जा प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आल्याने या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. – जयदत्त होळकर, सरपंच तथा अध्यक्ष सोळागाव पाणी पुरवठा देखभाल समिती

इतर बातम्याः

Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 59 अर्ज; कशी रंगलीय निवडणूक?

Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना निर्बंध वाढले; लग्नासाठी आता 50 वऱ्हाडी, जाणून घ्या नवे नियम…

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.