नवी मुंबईत महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ, सायबर सेलमध्येही चार पट तक्रारी

महिला अत्याचार, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. नुकतंच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने वार्षिक गुन्ह्यांची माहिती दिली (Navi mumbai annual crime) आहे.

नवी मुंबईत महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ, सायबर सेलमध्येही चार पट तक्रारी
Follow us
| Updated on: Jan 16, 2020 | 10:12 PM

नवी मुंबई : गेल्या वर्षभरात नवी मुंबईतील मालमत्ता, अपघात यासारख्या गुन्ह्यात घट झाल्याचे उघड झालं (Navi mumbai annual crime) आहे. तर 2018 पेक्षा गुन्ह्यात 72 गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. यात महिला अत्याचार, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. नुकतंच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने वार्षिक गुन्ह्यांची माहिती दिली (Navi mumbai annual crime) आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने वार्षिक गुन्ह्यांबाबत दिलेल्या माहितीनुसार, 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 72 गुन्हे वाढले आहेत. तर 2019 मध्ये महिला अत्याचार, सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. यात महिला अत्याचाराचे 602 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 587 गुन्हे उघडकीस यश आले आहे.

यात बलात्काराचे 169 गुन्हे दाखल झाले असून यात 166 गुन्हे उघड झाले आहेत. यात 111 बलात्कार हे ओळखीच्या मित्र आणि नातेवाईकांकडून झाले आहेत. फक्त एकच बलात्कार हा अनोळखी इसमाकडून झाला आहे. तर विनयभंगाचे 251 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 239 गुन्हे उघडकीस आले आहेमत.

त्याशिवाय 2019 ला सायबर गुन्ह्यात वाढ झाली असून 62 गुन्हे दाखल झाले आहेत. यात ऑनलाईन पेमेंट आणि ओटीपी शेअर केल्याने आर्थिक फसवणूक झाली आहे. सायबर सेलकडे 417 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 354 अर्जाची निकाली काढले (Navi mumbai annual crime) आहेत.

विशेष म्हणजे 2018 च्या तुलनेत सायबर सेलमध्ये चार पट तक्रारी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे दोषसिद्धी रेट वाढला आहे. यात बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, पोस्कोसारखे गुन्ह्यांचे आरोपी शोधून त्याच्यावर दोष सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तर आर्थिक गुन्हे शाखेने 75 गुन्ह्यांमध्ये 164 आरोपींना अटक करण्यात आले आहे. तर 2019 ला फरारी असलेले 111 आणि पाहिजे आरोपी प्रकारातील 255 अशा 366 आरोपींना पकडण्यात यश आले आहे.

त्याशिवाय अंमली पदार्थ विरोधी कारवाईत 154 गुन्हे दाखल होते. यात 245 आरोपी अटक असून 2.8 कोटींचे अमली पदार्थ हस्तगत केले (Navi mumbai annual crime) आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.