Navi Mumbai Corona | APMC मार्केट 11 ते 17 मेदरम्यान पूर्ण बंद, पाचही मार्केट बंद राहणार
येत्या 11 मे ते 17 मेपर्यंत मार्केट पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाशी येथील एपीएमसीतील प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील (Corona Virus) कोरोना रुग्णांच्या संख्येत (APMC Market Closed) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एपीएमसीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 11 मे ते 17 मेपर्यंत आठ दिवस एपाएमसी मार्केट पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाशी येथील एपीएमसीतील प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत भाजीपाला, फळे, धान्य मार्केट, मसाला मार्केट, कांदा बटाटा मार्केट हे पाचही मार्केट (APMC Market Closed) बंद असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाच्या प्रधान सचिवांनी हा निर्णय घेतला. यावेळी बैठकीला कोकण आयुक्त शिवाजी दौंड, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त आणासाहेब मिसाळ, नवी मुंबई पोलीस संयुक्त आयुक्त राजकुमार व्हटकर, डीसीपी पंकज दहाने, माथाडी नेता नरेंद्र पाटील आणि बाजार समितीचे व्यापारी उपस्थित होते.
Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पारhttps://t.co/ai6VVZUbkl#NaviMumbai #CoronaInMaharashtra #CoronaWarriors
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
मात्र, मार्केट बंद असलं तरीही मुंबईकरांना अन्न धान्याचा, भाजीपाल्याचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा होणार नाही, अशी माहिती अनुप कुमार यांनी दिली (APMC Market Closed).
एपीएमसी कोरोनाचा हॉटस्पॉट
एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एपीएमसीने कोरोना रुग्णांची शंभरी गाठली आहे. सध्या एपीएमसीत 125 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर नवी मुंबईत सध्या 484 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. गेल्या पाच दिवसात नवी मुंबईत तब्बल 184 नवे रुग्ण आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी एपीएमसीतील सर्व व्यापारी, सुरक्षा रक्षक आणि कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यावेळी तब्बल 5 हजार जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी 49 जणांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
APMC Market Closed
संबंधित बातम्या :
अवघ्या तीन दिवसात 161 पोलिसांना कोरोना, बाधित पोलिसांची संख्या 618 वर
Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा विळखा वाढताच, दिवसभरात 1,216 नवे रुग्ण, आकडा 17,974 वर
‘टीव्ही 9’ इम्पॅक्ट : एपीएमसीत हजारो कामगारांची कोरोना चाचणी, आणखी 59 जणांना लक्षणं