ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, एपीएमसी मार्केटमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केटमध्ये भरारी पथक तैनात
एपीएमसी मधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी धडक मोहीम सुरु केली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबधितांची संख्या 35 हजारांच्या पार गेली असून (APMC Market Violation Of Social Distancing Rules) आतापर्यंत 750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनामुळे शेकडो व्यपारी,माथाडी कामगार व कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे .वेळीच आवर घातला नाही तर खूप मोठं संकट येण्याची भीती आहे. यामुळे एपीएमसी मधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी धडक मोहीम सुरु केली आहे (APMC Market Violation Of Social Distancing Rules).
पाचही मार्केटमध्ये भरारी पथक तैनात करण्यात आला आहे. बाजार आवारात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच, त्यांची दुकानं सील करुन कारवाई केली जाणार आहे.
एकीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना असं सांगितलं की, मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर एपीएमसी मार्केटमध्ये सर्व नियम शिथील केले. त्यानंतर बाजार आवारात ना मास्क, वापरला जातो ना सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात आहे (APMC Market Violation Of Social Distancing Rules).
मार्केटमध्ये विविध राज्यातून शेतमाल येत असतो. मार्केटमध्ये गाड्याची आवक वाढली असून दररोज मार्केटमध्ये 1000 ते 1500 गाड्यांची आवक होत असते. भाजीपला मार्केटमध्ये दरदिवशी 25 ते 30 हजार लोकांची ये-जा आहे. यामुळे बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत आहे. मार्केटमध्ये ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. महापालिकेतर्फे मार्केटमध्ये अँटिझन टेस्ट करण्यात येत आहे. मात्र एपीएमसीत आरोग्य अधिकारी येत नसल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
भाजीपाला मार्केट रात्री 10 पासून सुरु होऊन सकाळी 11 वाजता संपते. घाऊक बाजारात किरकोळ व्यापार आणि पॅसेजमध्ये अनधिकृत व्यापारामुळे लोकांची गर्दी असते. वारंवार सांगूनही व्यापारी मार्केटमध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. ‘मार्केटमध्ये कोरोना फोरणा काही नाही, तुम्ही मीडियावाले वाढवून दाखवतात’, असं मार्केट उपसचिव वी. डी. कामिठे यांनी सांगितले.
भाजीपला मार्केटमध्ये दर दिवसात 12 ते 15 हजार लोक ये-जा करत असतात. तीन महिन्यात फक्त 150 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. भाजीपाला मार्केट उपसचिव कारवाईच्या नावाखाली फक्त खानापूर्ती करत आहेत.
नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, पालिकेकडून युद्ध पातळीवर तयारीhttps://t.co/dGrD7gG0Ah#NaviMumbai #CoronaWave
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2020
APMC Market Violation Of Social Distancing Rules
संबंधित बातम्या :