नवी मुंबईची जोडगोळी ड्रग्ज विक्रीसाठी पुण्यात, बाणेरमध्ये दोघे रंगेहाथ
नवी मुंबईतून दोघे जण पुण्यात अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतलं.
पुणे : लॉकडाऊनच्या काळातही पुणेकरांमध्ये अंमली पदार्थांची तल्लफ कमी झालेली दिसत नाही. ड्रग्ज विकताना नवी मुंबईतील पुरुष महिलेच्या जोडगोळीला पुण्यात रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. (Navi Mumbai Drug Sellers detained in Pune)
पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सर्वत्र ग्राहकांची गर्दी दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात अंमली पदार्थ खरेदी आणि विक्रीसाठी नशेबाज उतावीळ झाल्याचं दिसत आहे.
पुण्यात एमडी ड्रग्ज विकताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आलं. नवी मुंबईतील 43 वर्षीय विवेक लुल्ला आणि 30 वर्षीय हेमा सिंग यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे. दोघांकडे 65 ग्रॅम 450 मिलीग्राम एमडी अमली पदार्थ आढळून आला आहे. या कारवाईत तब्बल 3 लाख 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा : आलिशान कारची डिकी उघडली; टेम्पोतून शहाळी हटवली, पुणे पोलिसांना सापडला 120 किलो गांजा
बाणेर परिसरातील नॅशनल इन्शुरन्स अकॅडमीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबईतून दोघे जण पुण्यात अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतलं.
या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास सुरु आहे. हे ड्रग कुठून आणलं होतं आणि कोणाला विकण्यात येणार होतं. या ग्राहकांचाही तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे अंमली पदार्थाचं उत्पादन, विक्री आणि खरेदी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनच्या काळात याआधीही पुण्यात अंमली पदार्थ पकडण्यात आले आहेत. आलिशान कार आणि शहाळ्याच्या टेम्पोमधून 120 किलो गांजाची तस्करी होत असल्याचं उघड झालं होतं. विशाखापट्टणमहून मुंबईत गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीवर पुण्यात पोलिसांनी धडक कारवाई केली होती.
हुक्क्याची होम डिलिव्हरी
पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी होत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडलं होतं. गांजा, गुटखा, हुक्क्याच्या विक्रीचा प्रकार आतापर्यंत पुण्यात समोर आला आहे. ‘व्हॉट्स हॉट’ या संकेतस्थळावर मोबाईल संपर्क देऊन हुक्क्याची जाहिरात करण्यात आली. संकेतस्थळावर संपर्क करणाऱ्या व्यक्तीला हुक्क्याची घरपोच डिलिव्हरी केली जात होती.
गुटखा विकणारे पुणे पोलिसातील हवालदार
पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनेक गुन्हे घडत असल्याचं समोर आलं आहे. मृत मनपा कर्मचाऱ्याच्या ड्रेस घालून दोन तरुण गांजा आणायला गेल्याचं उघड झाल्यानंतर अवैध गुटखा पकडला होता. धक्कदायक म्हणजे तो आरोपी चक्क पुणे पोलिसातील हवालदार असल्याचं समोर आलं होतं.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी नाकाबंदीदरम्यान, बेकायदेशीर गुटखा घेऊन पळून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडलं होतं. हे आरोपी पळून जात होते, त्यावेळी त्यांना नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले होते.
मनपा कर्मचाऱ्याचे कपडे घालून गांजा आणायला
पुण्यात एका पठ्ठ्याने अनोखी शक्कल लढवली होती. महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून हा पठ्ठ्या चक्क गांजा आणण्यासाठी गेला होता. पोलिसांनी संशयावरुन पकडल्यानंतर या ‘चरसी’चं बिंग फुटलं. पुणे पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती.
VIDEO : रामा रामा.. मुंबईच्या रस्त्यात ड्रामा! पती दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये, ट्रॅफिकमध्ये नवऱ्याची कार अडवून बायकोचा हंगामाhttps://t.co/Tn8bITRfP5 #mumbai #MumbaiPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2020
संबंधित बातम्या
गांजा, गुटख्यानंतर आता पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी, कोंढव्यात 84 हजाराचा मुद्देमाल जप्त
लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला, पाठलाग करुन पकडलेला आरोपी निघाला पुणे पोलिसातील हवालदार!
(Navi Mumbai Drug Sellers detained in Pune)