स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष, नवी मुंबईत नागरिकांची 20 लाखांची फसवणूक
स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष दाखवून 25 पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला नवी मुंबईत अटक करण्यात आली
नवी मुंबई : स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष दाखवून 25 पेक्षा अधिक (Navi Mumbai Fraud) नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला नवी मुंबईत अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती नागरिकांचे जवळपास 20 लाख रुपये घेवून फरार झाला होता (Navi Mumbai Fraud).
पनवेलसह नवी मुंबई परिसरात विविध गृहप्रकल्पात स्वस्तात घरे, बंगले देण्याचे आमिष दाखवून 25 पेक्षा अधिक सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 19 लाख 63 हजार रुपये रोख रक्कम घेवून पसार झालेल्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने अटक केली आहे.
अश्विनी आर कंन्स्ट्रक्शनचे प्रोप्रा. रोहन रमेश आर्तेने तालुक्यातील नेरे या ठिकाणी व्टीन बंगले स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून सुमारे 25 पेक्षा अधिक सर्वसामान्य नागरिकांकडून बुकिंगसाठी 19 लाख 63 हजार रुपये घेवून त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या लोकांना समजताच त्यांनी याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-2 नवी मुंबईच्या पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. बी.जी. शेखर पाटील, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि सहपोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केला.
त्याअंतर्गत रोहन रमेश आर्तेला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.
पदभार स्वीकारताच पनवेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा धडाका, आठ वर्ष जुन्या हत्याकांडातील आरोपी गजाआड https://t.co/dsj5NrfAtb @jurno_harshal #Panvel
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
Navi Mumbai Fraud
संबंधित बातम्या :
गोंदियामध्ये 45 सेकंदांत 10 लाखांचे दागिने लंपास; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
दोन लाखांचे अमेरिकन डॉलर देतो सांगत ओला चालकाची फसवणूक, टोळी राज्यभर सक्रिय असल्याचा संशय