घरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई
आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग लावणाऱ्या एकाला नवी मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे (Police action on IPL Betting).
नवी मुंबई : आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग लावणाऱ्या एकाला नवी मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे (Police action on IPL Betting). विजय खैरनार असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्याकडून बेटिंगच्या साहित्यासह जवळपास 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजय घरात बेटिंगचे काम करत होता. पोलिसांनी घरावर छापा टाकून हा सट्टा उघडकीस आणला आहे (Police action on IPL Betting).
क्रिकेटचे सामने सुरू झाले की त्यावर बेटिंग लावणारे लोक अॅकटिव्ह होतात. या माध्यमातून लाखो रुपयांचा सट्टा लावला जात असतो. सध्या आयपीएल टी 20 क्रिकेट सामना सुरू आहे. यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. याचं दरम्यान नवी मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना माहिती मिळाली की, कोपरखैराने येथे सुयोज स्वराज सोसायटीमध्ये एका घरात ऑनलाइन बेटिंग सुरू आहे.
एसीपी विनोद चव्हाण आणि सेंट्रल युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी कोल्हटकर पथकाने सुयोग स्वराज सोसायटीमध्ये घरावर छापा टाकला. यावेळी विजय खैरनार घरामध्ये आढळून आला. तो बेटिंग लावण्यास इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना फोन लावून संपर्क साधून बेटिंगचे दर सांगत होता. तर बेटिंग लावण्यासाठी मोबाईलमधील अॅप्लिकेशनचा वापर करत होता. यासाठी त्याला संबंधित अॅप्लिकेशनचा आयडी कोणी पुरवला याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच यामध्ये अजून कित्ती लोक घरातून सट्टा लावतात याची चौकशी सुरू आहे.
खैरनारवर बेटिंग लावल्या प्रकरणी अटक करून कोपरखैराने पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करणयात आला आहे. खैरनारकडून दोन मोबाईल, टीव्ही तसेच 2 लाख रुपयांची रोकड एकूण जवळपास 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
शिर्डीत तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला ‘बॅड टच’, डॉक्टरला बेड्या