Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशेबाजीसाठी नवनवीन क्लुप्त्या; शितपेयामध्ये औषध टाकून नशा

खोकल्याचे औषध शीतपेयामध्ये मिसळून सध्या सर्रासपणे अल्पवयीन मुले नशा करीत असल्याचा प्रकार जुहूगाव चौपाटीवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला आहे.

नशेबाजीसाठी नवनवीन क्लुप्त्या; शितपेयामध्ये औषध टाकून नशा
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 9:23 AM

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सध्या अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या युवकांची संख्या दिवसेंदिवस (Cough Syrup Mixed In Cold Drink) वाढत चालली असून नशेसाठी नवनवीन क्लुप्त्या या नशेबाजांकडून लढवल्या जात आहेत. खोकल्याचे औषध शीतपेयामध्ये मिसळून सध्या सर्रासपणे अल्पवयीन मुले नशा करीत असल्याचा प्रकार जुहूगाव चौपाटीवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला आहे. त्यामुळे शहरात अंमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या मुलांमध्ये आणखी भर पडली आहे (Cough Syrup Mixed In Cold Drink).

नवी मुंबई शहरातील तरुणाई आज अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. यातील गर्भ श्रीमंत आणि मध्यम वर्गीय तरुण हुक्का पार्लर तर काही मुले इतर व्यसनाच्या आहारी गेले आहेत. याआधी शहरात मोठ्या प्रमाणात व्हायटिंगचे सेवन करुन नशा केली जात होती. तर आता मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या विविध औषधांच्या माध्यमातून नशा केली जात आहे. असाच एक प्रकार युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला आहे.

वाशी येथील जुहूगाव चौपाटी येथे मॉर्निंग वॉक अँड इव्हनिंग वॉकसाठी येणारे काही जेष्ठ नागरिकांची तक्रार होती की या ठिकाणी काही तरुण-तरुणी वाढदिवस सेलेब्रेशन, पार्टी या सर्व गोष्टी करत असताना अंमली पदार्थांचे सेवन देखील करीत आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई सामाजिक कार्यकर्ता किशोर पाटील नवी मुंबई काँग्रेस, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सचिव विनोद पाटील, युवक कांग्रेसचे सरचिटणीस डॉ. विजय पाटील यांनी एक शोध मोहीम हाती घेतली. तर यात एक भयानक बाब लक्षात अली जुहू चौपाटीच्या दर 10-10 मिनिटच्या अंतरावर अल्पवयीन मुलांचे गट पेप्सी आणि थम्स अप या शितपेयामध्ये खोकल्याचे औषध मिसळून नशा करताना पकडली.

त्यामुळे वाशीच्या जुहू चौपाटीसारख्या आतिशय गजबजेललेल्या परिसरात अशा प्रकारे नशापाणी होत असल्याने सर्वसमान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगर पालिकेने सुरक्षा रक्षकांमार्फत तसेच पोलिसांनी देखील असल्या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी नवी मुंबई युवक काँग्रेसकडून केली जात आहे.

Cough Syrup Mixed In Cold Drink

संबंधित बातम्या :

नागपुरात बेरोजगारांची दुप्पट रकमेचं आमिष दाखवून फसवणूक, 70 कोटींचा घोटाळा?; आठ जणांना अटक

चंद्रपुरात भाजप नगरसेविकेची सामाजिक कार्यकर्त्याच्या घरात घुसून तोडफोड

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटला, पोटमाळ्यावरुन शेजारच्या घरात चोरी, रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.