कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता, नवाज शरीफांची कबुली

"पाकिस्तानी सैन्याला शस्त्र आणि अन्नसाठ्याविना टेकड्यांवर पाठवण्यात आल्याचे समजले तेव्हा खेद वाटला. त्या युद्धात सैनिक मारले गेले मात्र पाकिस्तानला काय मिळाले?", असा सवाल नवाज शरीफ यांनी उपस्थित केला. (Nawaz Sharif blame jawed Bajwa  and Faiz Ahmed for Kargil war)

कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता, नवाज शरीफांची कबुली
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 12:45 PM

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कारगिल युद्धावरुन तत्कालीन लष्करी अधिकारी कमर जावेद बाजवा आणि लेफ्टनंट जनरल फैज अहमद यांच्यावर निशाणा साधला आहे. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैनिकांकडे शस्त्र उपलब्ध नव्हती. “पाकिस्तानी सैन्याला शस्त्र आणि अन्नसाठ्याविना टेकड्यांवर पाठवण्यात आल्याचे समजले तेव्हा खेद वाटला. त्या युद्धात सैनिक मारले गेले मात्र पाकिस्तानला काय मिळाले?”, असा सवाल नवाज शरीफ यांनी उपस्थित केला. (Nawaz Sharif blame jawed Bajwa  and Faiz Ahmed for Kargil war)

नवाज शरीफ पाकिस्तान डेमोक्रेटिक मुव्हमेंटच्या एका बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. पाकिस्तानातील 11 विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीत नवाज शरिफांनी कारगिल युद्धावर भाष्य केले.

कारगिल युद्धात पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले गेले. यामुळे संपूर्ण जगभरात पाकिस्तानी सैन्याची बेईज्जती झाली. कारगिल युद्ध पाकिस्तानी सैन्यातील जनरल दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यांमुळे झाल्याची टीका शरीफ यांनी केली.लष्करी अधिकाऱ्यांनी देशाला आणि सैन्याला युद्धात ढकलून दिले. पाकिस्तानला याचा काहीच फायदा झाला नसल्याचे शरीफ यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानातील सध्याचे पंतप्रधान इमरान खान यांच्याविरुद्ध आमचा लढा नसून तो देशातील असंविधानिक शक्तींविरोधात आहे. त्या शक्तींच्या बळावर इमरान खान सत्तेत आले, असं नवाज शरीफ म्हणाले आहेत. इमरान खान राजकारणात अपरिपक्व असल्याची टीका शरीफ यांनी केली.

नवाज शरीफ यांच्या जावयाला अटक आणि सुटका

दरम्यान,पाकिस्तानात गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड गदारोळ सुरु असल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून मोर्चे काढून सरकारचा निषेध व्यक्त केला गेला होता. पाकिस्तान सैन्याने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई मोहम्मद सफदर यांना अटक केली. या अटकेला विरोध झाल्यानंतर त्यांची सुटकादेखील करण्यात आली.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानमध्ये नागरी युद्धाची स्थिती, सैन्य आणि पोलीस आमने-सामने, कराचीत तिरंगाही फडकावला?

नवाज शरीफांच्या जावयाला अटक, नंतर सुटका, पाकिस्तानात प्रचंड गदारोळ, सरकारविरोधात विरोधकांचा आक्रोश

(Nawaz Sharif blame Jawed Bajwa  and Faiz Ahmed for Kargil war)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.