Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकीकडून बलात्कार, पत्नीची पोलिसात तक्रार

नवाझुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिने त्याच्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे

Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकीकडून बलात्कार, पत्नीची पोलिसात तक्रार
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 1:03 PM

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे. पत्नी आलिया सिद्दीकीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत त्याच्या कुटुंबावरही गंभीर आरोप केले होते. मात्र आता तिने थेट नवाजविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात आलियाने लेखी तक्रार नोंदवल्यामुळे पुन्हा एकदा नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. (Nawazuddin Siddiqui to face rape accuse by wife Aaliya Siddiqui)

भारतीय दंड संहिता कलम 375, 376 (के), 376 (एन), 420 आणि 493 अंतर्गत आलियाने तक्रार नोंदवल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यातच नवाज आणि त्याच्या कुटुंबातील अन्य चार सदस्यांविरोधात नोंदवलेल्या तक्रारीसंदर्भात आलिया सिद्दिकीने मुझफ्फरनगरमधील बुढाना पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला होता. या संदर्भात पोलीस नवाजुद्दिनशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आलिया सिद्दिकीने काही महिन्यांपूर्वी नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने म्हटले होते की, लग्नानंतर वर्षभरातच माझ्या आणि नवाजच्या नात्यात ताणतणाव आले. तेव्हापासून मी सर्व काही संयमाने हाताळत होते. पण आता सहन करणे कठीण झाल्याने मी हे पाऊल उचलले आहे. नवाज आणि आलिया यांना दोन अपत्ये असून त्यांच्या कस्टडीची मागणी आलियाने केली आहे. लॉकडाऊन झाल्यापासून नवाज आपल्या आईसह उत्तर प्रदेशातील मूळ गावी राहत आहे.

आलिया-नवाजची प्रेमकहाणी

आलिया ही नवाजुद्दिनची बालपणीची मैत्रीण. तिचे माहेरचे नाव अंजली पांडे. एकाच गावात राहणाऱ्या अंजली आणि नवाजच्या प्रेमप्रकरणाला तिथूनच सुरुवात झालेली. काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडू लागल्याने त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

नवाजने 2011 मध्ये शीबा नावाच्या मुलीशी लग्न केले. मात्र हे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. त्याने 2012 मध्ये शीबाला घटस्फोट दिला. यावर बोलताना त्याने म्हटलेले की, शीबा खूप चांगली होती. मात्र तिच्या भावामुळे आमच्या नात्यात वितुष्ट आले. यानंतर त्याने सह-अभिनेत्री सुजैनला डेट केले होते. अभिनेत्री निहारिका सिंगबरोबरही त्याचे नाव जोडले गेले होते. याच दरम्यान त्याने पुन्हा एकदा अंजलीची भेट घेतली आणि तिला थेट लग्नासाठी विचारले.

नवाजसोबत लग्न केल्यानंतर अंजली पांडेने आपले नाव बदलून आलिया सिद्दीकी असे केले. दरम्यान नवाजुद्दिनने त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. मात्र यात त्याने अनेक वादग्रस्त वक्तव्य आणि अनेक गौप्यस्फोट केले. त्याच्या या पुस्तकावर काही अभिनेत्रींनी आक्षेप घेतल्यामुळे ते प्रसिद्ध होऊ शकले नाही.

आलियाने 2017 मध्ये नवाजवर हेरगिरीचा आरोप लावला होता. आपण कुठे जातो, काय करतो या सगळ्या गोष्टींवर तो लक्ष ठेवत असल्याचा आरोप तिने केला होता. त्यानंतरही त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचे त्यावेळी त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या 

नवाजुद्दीन सिद्दीकी ईदसाठी मुंबईहून उत्तर प्रदेशला, 14 दिवस सहकुटुंब क्वारंटाईन

(Nawazuddin Siddiqui to face rape accuse by wife Aaliya Siddiqui)

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.