बिहारमध्ये नक्षलवादी हल्ला, गया जिल्ह्यात नियोजित पोलीस ठाण्याची इमारत स्फोटकांनी उद्ध्वस्त

गया जिल्ह्यातील बोधी बिगहा मधील सार्वजनिक सभागृहाची इमारत डायनामाईटचा स्फोट करुन उद्धवस्त करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे सुरु होणार होते. (Naxal attack in Gaya District of Bihar)

बिहारमध्ये नक्षलवादी हल्ला, गया जिल्ह्यात नियोजित पोलीस ठाण्याची इमारत स्फोटकांनी उद्ध्वस्त
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 1:43 PM

गया : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांच्या गया जिल्ह्यातील बोधी बिगहा गावात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. बोधी बिगहा मधील सार्वजनिक सभागृहाची इमारत डायनामाईटचा स्फोट करुन उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. बिहारमधील गया या जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या प्रभाव आहे. (Naxal attack in Gaya District of Bihar)

गया जिल्ह्यातील डुमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधी बिगहा गावातील सार्वजनिक सभागृह नक्षलवाद्यांनी डायनामाईटचा स्फोट करुन उडवून दिले. या सभागृहाचे उद्गाटन जीतनराम मांझी यांनी मागील महिन्यात केले होते. स्फोटात उडवून दिलेल्या सभागृहात पोलीस ठाणे सुरु करण्यात येणार होते. नक्षलवाद्यांनी या घटनेनंतर गोळीबार करत गावातून निघून गेल्याची माहिती आहे.

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही. डुमरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी विमल कुमार यांनी या घटनेला पुष्ठी दिली आहे. नक्षलवाद्यांनी घटनास्थळावर पत्रक देखील टाकले होते. यामध्ये घटनेची जबाबदारी स्वीकारत धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

पोलिसांकडील सूत्रांनुसार, नक्षलवादी हल्ला झालेल्या ठिकाणी डुमरिया पोलीस ठाण्याचे कार्यालय सुरु करण्यात येणार होते. जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं घटनास्थळी जाऊन या घटनेची माहिती घेतली आहे. पोलिसांनी यानंतर ठिकठिकाणी छापेमारी करत नक्षलवाद्यांचा शोध सुरु केला आहे.

गया जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नक्षलवाद्यांनी यापूर्वी हल्ले केले आहेत.

दरम्यान, बिहारमध्ये आज जेडीयू आणि भाजपप्रणीत एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नितीशकुमार हे सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जेडीयू आणि भाजपचे प्रत्येकी 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यासोबत हम आणि विकासशील इन्सान पार्टीचा 1 आमदार मंत्रिपदाची शपथ घेईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या:

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला, 17 जवानांना वीरमरण

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर मोठा हल्ला, 14 जवान जखमी, 13 बेपत्ता

(Naxal attack in Gaya District of Bihar)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....