ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स
सध्या दिल्लीत असल्याने, क्षितीज शुक्रवारी सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचणार आहे. (NCB summons dharma production director kshitij Prasad)
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह, श्रद्धा कपूरनंतर एनसीबीने आता करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद यांना समन्स पाठविले आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या तपासाच्या दरम्यान सुरू झालेल्या ड्रग्ज रॅकेटच्या तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. यामुळे संपूर्ण बॉलिवूडच यात सामील आहे का असा प्रश्न पडू लागला आहे. (NCB summons dharma production director kshitij Prasad)
क्षितीज प्रसाद (kshitij Prasad) यांची शुक्रवारी चौकशी केली जाणार आहे. त्यांच्यासमवेत शुक्रवारी दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह आणि करिश्मा प्रकाश यांचीही चौकशी केली जाईल. बॉलिवूडचे तब्बल 50 सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे. एनसीबीने ड्रग्ज तस्करांची चौकशी केल्यानंतर या सेलिब्रिटींची यादी तयार केली आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार चौकशी
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने धर्मा प्रोडक्शनचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद (Kshitij Prasad) यांना गुरुवारी (24 सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावले. पण तो सध्या दिल्लीत असल्याने, त्याची चौकशी शुक्रवारी केली जाणार आहे. क्षितीज शुक्रवारी सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचणार आहे.
सुशांत प्रकरणात एनसीबीकडून दोन एफआयआर दाखल
सुशांत प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत दोन एफआयआर दाखल केल्या आहेत. तर याच प्रकरणात रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), शौविक चक्रवर्ती आणि ड्रग्ज तस्करांच्या चौकशीदरम्यान ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांनाही एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. 50 बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत. यात अनेक प्रसिध्द अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी-ग्रेड चित्रपटाच्या निर्मात्यांची नावे असल्याचे म्हटले जात आहे. (NCB summons dharma production director kshitij Prasad)
जया साहाच्या चौकशी दरम्यान दीपिका पदुकोण (deepika padukone), सिमॉन खंबाटा (Simone khambata) आणि करिश्मा प्रकाश यांची नावे समोर आली आहेत. तर, रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांची नावे रिया चक्रवर्तीने घेतली होती. यापैकी करिश्मा प्रकाश दीपिका पदुकोणची मॅनेजर असून, तिने दीपिकासाठी ड्रग्जची सोय केली होती.
एनसीबी एफआयआरनुसार..
एनसीबीने (NCB) ड्रग्ज प्रकरणात दोन एफआयआर नोंदविल्या आहेत, त्यापैकी एफआयआर क्रमांक 15/20 अंतर्गत दीपिका पदुकोण चौकशी केली जाणार आहे. तर याच एफआयआर अंतर्गत एनसीबी रकुल प्रीत सिंगही चौकशी करेल. दुसरी एफआयआर क्रमांक 16/20 अंतर्गत सारा अली खान आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची चौकशी केली जाणार आहे. गुरुवारी (24 सप्टेंबर) सिमॉन खंबाटाची चौकशी केली जात आहे. तर, 25 सप्टेंबरला दीपिका पदुकोण, रकुलप्रीत सिंह आणि सिमॉन खंबाटा यांच्यासह आता क्षितीज प्रसादचीही चौकशी केली जाणार आहे. यानंतर शनिवारी, 26 सप्टेंबरला सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची चौकशी होणार आहे.
(NCB summons dharma production director kshitij Prasad)
VIDEO : Deepika Padukone | दीपिका आज गोव्यातून मुंबईत येणार, NCBकडून समन्सhttps://t.co/QuqdpvuEms
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 24, 2020
संबंधित बातम्या :
Bollywood Drugs Case | अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांना एनसीबीचा समन्स