जी खबरदारी महाराष्ट्राने घेतली, ती दिल्ली सरकारने का घेतली नाही? तब्लिगीवरुन पवारांचा सवाल

गर्दी टाळूया, अंतर राखूया," असेही आवाहन शरद पवारांनी सर्व जनतेला (Sharad Pawar on delhi nizamuddin markaz) केलं. 

जी खबरदारी महाराष्ट्राने घेतली, ती दिल्ली सरकारने का घेतली नाही? तब्लिगीवरुन पवारांचा सवाल
Follow us
| Updated on: Apr 06, 2020 | 12:20 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत (Sharad Pawar on delhi nizamuddin markaz) आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी “कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनच्या शेवटच्या काळात काळजी घ्या,” असे आवाहन शरद पवार यानी यावेळी केले. तसेच त्यांनी दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणच्या कार्यक्रमावरही भाष्य केले.

“डॉक्टर, नर्स हे कष्टाने काळजी घेत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी घरी (Sharad Pawar on delhi nizamuddin markaz) बसायला पाहिजे. सर्व जात- धर्मांनी एकत्र राहण्याची आवश्यकता आहे,” असे शरद पवार यावेळी म्हणाले.

“दिल्लीत निजामुद्दीन जवळ जे संमलेन झालं खरतरं अशा परिस्थिती हे संमलेन घ्यायला नको होतं. त्या संमलेनाला ज्यांनी परवानगी दिली होती, त्याची अजिबात परवानगी देण्याची गरज नव्हती,” असे शरद पवार म्हणाले.

“महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे संमलेनाची विनंती धार्मिक संघटनांनी केली होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री यांनी विचार करुन ही परवानगी नाकारली. म्हणून ती खबरदारी दिल्लीत घेतली असती तर हे घडलं नसतं,” असेही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

“सोलापुरात बैल घोडा शर्यती करण्याची गरज नव्हती मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केली, असेही शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर प्रशासनाचे कौतुक केले. दिल्लीतील संमेलनाविषयी वारंवार टीव्हीवर दाखवण्याची गरज नाही,” असेही ते यावेळी म्हणाले.

“कोरोनाबाबत मी जे काही टीव्हीवर बघतो. त्यापेक्षा व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरचे मॅसेज काळजी करण्यासारखे आहेत. त्यातील 5 पैकी 4 मॅसेज हे खोटे असतात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे,” असे आवाहन शरद पवारांनी केले.

“येत्या काळात रोजगार कमी होण्याची शक्यता आहे. या संकटाला कसं तोंड द्यावं, यावर जाणकारांनी विचार करायला हवा,” असेही शरद पवार म्हणाले.

“केंद्राने राज्यांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे, शेती संदर्भात मदत करण्याची गरज, रबी हंगाम संपत आला आहे, पीके वेळीच काढली नाहीत तर मोठं नुकसान होईल. त्यामुळे सर्व राज्यांना सर्व भाषेत टीव्ही आणि अन्य माध्यमातून केंद्राच्या कृषी विभागाने मार्ग दाखवावा,” असेही आवाहन शरद पवारांनी केले.

“यावर्षी महावीर जयंती, शब्बे-बारात घरातच करा, मुस्लीम बांधवांनी घरातच पूर्वजांचे स्मरण करा. महात्मा फुले जयंतीला ज्ञानदीप लावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधानाचा दीप लावून साजरी करुया, गर्दी टाळूया, अंतर राखूया,” असेही आवाहन शरद पवारांनी सर्व जनतेला (Sharad Pawar on delhi nizamuddin markaz) केलं.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.