‘गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर अधिकार्‍यांनी सवाल उपस्थित केले त्यावेळी राजीनामा घेतला होता का?’

रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना शिकवू नये. भाजप नैतिकतेच्या गप्पा मारते. | Nawab Malik

'गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर अधिकार्‍यांनी सवाल उपस्थित केले त्यावेळी राजीनामा घेतला होता का?'
nawab malik
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 3:44 PM

मुंबई: गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर आणि गृहमंत्र्यांवर अधिकार्‍यांनी सवाल उपस्थित केले होते त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. (NCP leader Nawab Malik slams BJP)

भाजपचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी रविवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना शिकवू नये. भाजप नैतिकतेच्या गप्पा मारते. मात्र, सगळ्या नियमांना हरताळ फासणाऱ्या भाजपला हा अधिकार नाही, अशी टीका मलिक यांनी केली.

याशिवाय, परमबीर सिंह यांचे पत्र ही ठरवून केलेल्या एका कटाचा हिस्सा आहे. परमवीरसिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे आहे त्यामुळे चौकशीतून याची सत्यता समोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

‘परमबीर सिंहांनी कटकारस्थान करुन गृहमंत्र्यांना बदनाम केले’

परमबीर सिंह यांना 17 मार्चला बदली होणार हे माहित असताना 16 मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेंना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचदरम्यान अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर 27 फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणात होते. 27 फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा प्रयत्न होता, असेही नवाब मलिक म्हणाले.

संबंधित बातम्या:

केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून पडलेत का; लेटरबॉम्ब प्रकरण विरोधकांवर बुमरँग होईल: संजय राऊत

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी चिरंजीवांवर ‘मातोश्री’ची कृपा, विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद

मोठी बातमी: NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

(NCP leader Nawab Malik slams BJP)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.