Rohit Pawar | या केसमध्ये माझ्यावर अन्याय होत आहे, रोहित पवार काय म्हणाले ?

गेल्या आठवड्यातच झालेल्या चौकशीनंतर राष्ट्रवादीचे तरूण नेते रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होत आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. गेल्या आठवड्यात 24 जानेवारी रोजी याच प्रकरणात त्यांची तब्बल 11 तास ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली.

Rohit Pawar | या केसमध्ये माझ्यावर अन्याय होत आहे, रोहित पवार काय म्हणाले ?
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 2:37 PM

मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : गेल्या आठवड्यातच झालेल्या चौकशीनंतर राष्ट्रवादीचे तरूण नेते रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होत आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. गेल्या आठवड्यात 24 जानेवारी रोजी याच प्रकरणात त्यांची तब्बल 11 तास ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. तेव्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ईडी कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या एनसीपीच्या कार्यालयात तळ ठोकून बसले होते. आज पुन्हा रोहित पवार यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज पुन्हा कार्यकर्त्यांनी मुंबईत गर्दी करण्यात सुरुवात केली आहे. रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजीदेखील केली जात आहे.

मी काही चुकीचं केलेलं नाही

मी व्यवसायात आधी आलो पण मी व्यवसायात काही चुकीचं केलेलं नाही असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. मी आधीही संघर्ष केला, आजही संघर्ष सुरूच आहे. ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत आहेत , मी त्यांना याआधीही सहकार्य केलं आहे आणि आताही संपूर्ण सहकार्य करत आहोत. जी काही माहिती कागदपत्रे मागितली ती देणार आहोत. EOW ने क्लोजर रिपोर्ट दाखल केला हे मला समजलं, मला तो मिळावा यासाठी आम्ही कोर्टात पत्र देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणुकीच्या तोंडावर ही जा कारवाई करण्यात येत आहे, त्याचा लोकांमध्ये वेगळा संदेश जात आहे, असे ते म्हणाले. या केसमध्ये माझ्यावर कुठेतरी अन्याय होत आहे. मी माझ्या बाजूने, माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे. आणि ती लढाई सुरू असताना, कदाचित त्याचा फायदा इतर नेत्यांना नक्कीच होईल असं मला वाटतं, असही रोहित पवार यांनी नमूद केलं.

अजित पवारांवर केली होती टीका

पहिल्या ईडी चौकशीनंतर रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली होती. ”पळणाऱ्यांच्या पाठीमागे साहेब (शरद पवार) थांबत नाहीत पण लढणाऱ्यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहतात. हा वारसा विचारांचा आणि स्वाभिमानाचा आहे. आपल्या सगळ्यांची संघर्षाची तयारी असली पाहिजे. ” असं ते म्हणाले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.