PHOTO : प्रकृतीची विचारपूस ते राजकीय चर्चा, संजय राऊतांच्या कुटुंबियांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अनौपचारिक गप्पा
Follow us
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.
संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून ही भेट घेण्यात आली.
शरद पवार-संजय राऊत यांच्या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत चर्चा झाली.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर या भेटीत चर्चा करण्यात आली.
या भेटीनंतर संजय राऊत यांच्या कुटुंबियांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनौपचारिक गप्पाही मारल्या.
यावेळी धनंजय मुंडे, गायक आनंद शिंदे यांनी संजय राऊत यांच्या आईंना पाय पडत नमस्कार केला.
नुकतंच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. यानंतर काल (5 डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.